सत्तेसाठी शिवसेना हिंदुविरोधी झाली : आमदार कृष्णा खोपडे

उद्धव ठाकरे यांच्या मनातही स्वागताची भावना असावी. मात्र शरद पवार आणि सोनिया गांधी यांची एनओसी नसल्याने शिवसेनेने राम मंदिर उभारणीच्या स्वागतात कंजुसी केली असावी, असा टोलाआमदार कृष्णा खोपडे यांनी लगावला.
Krishna Khopde
Krishna Khopde

नागपूर : सत्तेसाठी शिवसेनेने भारतीय जनता पक्षासोबतची मैत्री तोडली. सत्तेसाठीच कॉंग्रेस आणि राष्ट्रवीदी कॉंग्रेससोबत हातमिळवणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः अयोद्धेला गेलेले आहेत. त्यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनाचे स्वागत करायला हवे होते, पण ‘जय श्रीराम’चा जयघोष करणाऱ्या रामभक्तांवर त्यांनी कारवाई केली. शेवटी सत्तेसाठी शिवसेना हिंदुविरोधीही झाली, असा आरोप भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी केला.

अयोध्येत राम मंदिर उभारले जात असल्याने महाआघाडी सरकार चांगलेच नाराज झाले आहे. त्यांनी पोलिसांच्या माध्यमातून ठिकठिकाणी श्री रामाचा जयघोष करणाऱ्यांवर कारवाई केली. अयोध्येला जाणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राममंदिराच्या भूमिपजूनाचे स्वागत करणे अपेक्षित होते. मात्र ठाकरे सरकारने रामभक्तांवर कारवाई करून आपल्या हिंदूविरोधी मानसिकतेचा परिचय दिला. सत्तेसाठी शिवसेना हिंदूविरोधी तर झालीच, पण व्होट बँकेसाठी त्यांनी हिरवा झेंडा स्विकारलेला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जय श्रीराम म्हणणाऱ्यांवर कारवाई होईल, असे आधीच जाहीर केले होते. वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांनी ती कारवाई केलीसुद्धा.

काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्या वक्तव्यानंतर पालकमंत्री नितीन राऊत यांना रामाची आठवण आली आणि कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी हनुमान चालीसा पठन केली, असेही खोपडे म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीरपणे बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला अभियान आहे, असे सांगितले होते. उद्धव ठाकरे यांच्या मनातही स्वागताची भावना असावी. मात्र शरद पवार आणि सोनिया गांधी यांची एनओसी नसल्याने शिवसेनेने राम मंदिर उभारणीच्या स्वागतात कंजुसी केली असावी, असा टोलाही आमदार कृष्णा खोपडे यांनी लगावला.    (Edited By : Atul Mehere) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com