Wani Todfod
Wani Todfod

शिवसैनिकांनी "त्या' दोघांच्या दुकानांची केली तोडफोड 

24 मे च्या रात्री पिंपळे व पांडे या दोघांवर गुन्हा दाखल केल्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी दोघांनाही कठोर शिक्षा करण्याची मागणी केली होती. मात्र काल दिवसभरातही कारवाई न झाल्याने आज शिवसैनिकांच्या संयमाचा बांध फुटला.

वणी (जि. यवतमाळ) ः येथील व्यावसायिक विवेक पांडे आणि सतीष पिंपळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार आणि कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबाबत सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. शिवसैनिकांच्या तक्रारीवरुन 24 मे रोजी पिंपळे व पांडे या दोघांवरही गुन्हा तर दाखल झाला, पण अपेक्षित कारवाई न झाल्याने शिवसैनिक संतापले होते. अखेर आज त्यांनी 
जिल्हाप्रमुख विश्‍वास नांदेकर यांच्या नेतृत्वात दोघांच्याही दुकानांची तोडफोड केली. 

24 मे च्या रात्री पिंपळे व पांडे या दोघांवर गुन्हा दाखल केल्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी दोघांनाही कठोर शिक्षा करण्याची मागणी केली होती. मात्र काल दिवसभरातही कारवाई न झाल्याने आज शिवसैनिकांच्या संयमाचा बांध फुटला. आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास विश्‍वास नांदेकर कार्यकर्त्यांसह नांदेपेरा मार्गावरील सतीश पिंपळे यांच्या रसवंतीमध्ये गेले आणी साहित्याची तोडफोड केली. तेथून त्यांनी आपला मोर्चा जटाशंकर चौकात असलेल्या विवेक पांडे यांच्या मोबाईल शॉपीकडे वळवला. तेथेही शिवसैनिकांनी दुकानातील साहित्याची तोडफोड केली. ही माहीती मिळताच ठाणेदार वैभव जाधव ताफ्यासह तेथे पोहोचले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अवमानजनक पोस्ट केल्यानंतरही शिवसैनिक गप्प कसे, अजून काहीच कसे केले नाही, आतापर्यंत शिवसेना स्टाईलने उत्तर कसे दिले गेले नाही, शिवसेनेची आक्रमकता गेली कोठे, असे एक ना अनेक प्रश्‍न काल लोकांमध्ये विचारले जात होते. अखेर आज शिवसैनिकांनी दुकानांची तोडफोड केल्यानंतर सामान्यांमध्ये सुरु असलेल्या चर्चांना विराम मिळाला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com