शिवसैनिक म्हणाले, गजानन कीर्तिकरांनी मराठी-अमराठी वाद बाजुला ठेवावा ! 

यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेमधून दुष्यंत चतुर्वेदीविधान परिषदेवर निवडून गेले आहे. त्यांना आता विदर्भाचे नेतृत्व करण्याचे स्वप्न पडू लागले आहे. त्याकरिता निष्ठावंतांना बदनाम करण्यासाठी प्रसिद्धिप्रमुख नितीन तिवारी व काही अमराठी पदाधिकाऱ्यांना त्यांनी कामाला लावले आहे. याची सर्व कल्पना श्रेष्ठींना असल्याचे विदर्भाचे संपर्कप्रमुख कीर्तिकर म्हणाले.
Gajanan Kirtikar
Gajanan Kirtikar

नागपूर : खंडणी प्रकरणामुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद उफाळून आले आहेत. संपर्कप्रमुख गजानन कीर्तिकर यांना कार्यकारिणी नेमताना प्ररप्रांतीय दिसले नाहीत का? असा सवाल आता शिवसैनिक उपस्थित करून लागले आहेत. आपल्या काही समर्थकांना पाठीशी घालण्यासाठी मराठी-अमराठी वाद निर्माण केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. हा वाद बाजूला ठेऊन कीर्तिकरांनी कठोर भूमिका घेऊन शिवसेनेला वाचवावे, अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे. 

पूर्व नागपूरमध्ये उपजिल्हाप्रमुख रविनीश पांडेय, दक्षिण नागपूर उपजिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया, उत्तर नागपूर संघटक सुनील बॅनर्जी, दक्षिण-पश्‍चिम नागपूर संघटक प्रवीण शर्मा, दक्षिण नागपूर संघटक राजेश कनोजिया, उत्तर नागपूर विभागप्रमुख मनोज शाहू, प्रसिद्धिप्रमुख नितीन तिवारी, कार्यालय प्रमुख मुन्ना तिवारी यांना कार्यकारिणी स्थान दिले तेव्हा मराठी-अमराठी असा विचार का करण्यात आला नाही. माजी जिल्हाप्रमुख शेखर सावरबांधे, सतीश हरडे, चंद्रहास राऊत, सूरज गोजे, किशोर कन्हेरे हे तर मराठीच होते. त्यांना का बरं हटविले याचेही उत्तर कीर्तिकर यांनी द्यावे. 

प्रकाश जाधव रामटेकचे खासदार होते. दोनदा विधानसभेची तर एकदा विधान परिषदेची उमेदवारी दिली. वनविकास महामंडळाचे अध्यक्षपदसुद्धा त्यांना दिले होते. आतापर्यंत चारवेळा त्यांना जिल्हाप्रमुख करण्यात आले. इतके सारे देऊनही एक ग्रामपंचायत त्यांना निवडून आणता आली नाही. आपसातील कुरघोडी आणि सोयीच्या भूमिकेमुळे शिवसेनेचे नुकसान होत आहे. मराठी आणि अमराठी वाद बाजूला ठेऊन संपर्कप्रमुख गजानन कीर्तिकर यांनी कठोर भूमिका घेऊन शिवसेनेला वाचवावे, अशी मागणी दक्षिण नागपूर उपविभागप्रमुख राजेश रुईकर, सुखदेव ढोके, आनंद नेऊळगावकर, प्रवीण अंधारे, नितीन ठवकर, महेंद्र अट्याळकर, शुभम बालपांडे, शुभम घोडे आदींनी केली आहे. 

षड्‌यंत्र रचले जात आहे 
विदर्भातील मराठी माणसाचे नेतृत्व संपवण्यासाठी हिंदी भाषिक पदाधिकारी षड्‌यंत्र रचत आहेत. खोट्या तक्रारी दाखल करून त्यांना बदनाम केले जात आहे. मंगेश कडव, विक्रम राठोड यांचे कृत्य वैयक्तिक आहे. त्याचा शिवसेनेशी संबंध नाही. जिल्ह्याचे नेतृत्व एक मराठी नेता माजी खासदार प्रकाश जाधव यांच्याकडे सोपवले आहे. ते काही हिंदी भाषकांना पचनी पडत नाही. त्यांना बदनाम करण्यासाठी रोज वेगवेगळ्या अफवा व बातम्या पसरवल्या जात आहे. माजी मंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सतीश चतुर्वेदी यांचा मुलगा दुष्यत चतुर्वेदी यांनी अलीकडेच शिवसेनेत प्रवेश केला. यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेमधून ते विधान परिषदेवर निवडून गेले आहे. त्यांना आता विदर्भाचे नेतृत्व करण्याचे स्वप्न पडू लागले आहे. त्याकरिता निष्ठावंतांना बदनाम करण्यासाठी प्रसिद्धिप्रमुख नितीन तिवारी व काही अमराठी पदाधिकाऱ्यांना त्यांनी कामाला लावले आहे. याची सर्व कल्पना श्रेष्ठींना असल्याचे विदर्भाचे संपर्कप्रमुख कीर्तिकर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com