अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त एकवटले मेंढपाळ, रक्तदान करून दिला संदेश... - shepherds gathered on the ajit dadas birthday and donate blood | Politics Marathi News - Sarkarnama

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त एकवटले मेंढपाळ, रक्तदान करून दिला संदेश...

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 21 जुलै 2021

रक्तदानाचे महत्व ओळखून धनगर मेंढपाळ बांधवांनी स्वतःच हे शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरातून राज्यात रक्तदानाबाबत जागृतीचा संदेश जावा, हाच यामागील उद्देश आहे.

अमरावती : वनक्षेत्रांतील जंगलात Forest आपापल्या मेंढ्यांसह राहणारे मेंढपाळ, Shephered धनगर जिल्ह्यातील भानखेड येथील बेड्यावर एकवटले. रक्तदान केले. वृक्षलागवड करून जंगल रक्षणाची शपथही घेतली. मेंढपाळ धनगर विकास मंच, महाराष्ट्र या संघटनेच्यावतीने भानखेड्यातील हरिभाऊ शिंदे Haribhau Shinde यांच्या बेड्यावर जात हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार Deputy Chief Minister Ajit Pawar यांच्या वाढदिवसानिमित्त या खास उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मेंढपाळांना ऑक्सिमीटर, मास्क, एलईडी टॉर्चचे वाटपही करण्यात आले. सदैव एकत्रित राहण्याचा, ऋणानुबंध जोपासण्याचा निर्धार यावेळी मेंढपाळ बांधवांनी केला. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सुरेखा ठाकरे, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम आदींची प्रमुख उपस्थिती होती. वनात राहणाऱ्या मेंढपाळांना राष्ट्रीय प्रवाहात आणणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. 

संतोष महात्मे यांनी हे आयोजन केले होते. यावेळी मेंढपाळांनी पारंपरिक धनगरी नृत्य सादर केले. यशस्वितेसाठी डॉ. मेघश्याम करडे, जानराव कोकरे, निखिल ठाकरे, झामा कारंडे, तुकाराम येमगर, शरद शिंदे, शेकलाल शिंदे, मंगेश शिंदे, ज्योतीराम कोरडकर, भाऊराव ठोंबरे, नाना कोकरे, लक्ष्मण आमनर, अर्जुन पिसाळ, हरी टिळे, मन्साराम टिळे, रामा टिळे, चिमाजी येमगर, गोमा पोकळे, विलास टिळे, भाऊराव पोकळे, गुणवंत पोकळे आदींनी सहकार्य केले.

सामान्यपणे सुशिक्षित वर्गाला रक्तदान करण्याचे आवाहन केल्यानंतरही काही अपवाद वगळता कुणीही फारसे समोर येत नाहीत, असा आजवरचा अनुभव आहे. मात्र जंगल, डोंगरांमध्ये खांद्यावर घोंगडे आणि हाती काठी घेऊन शेळ्या मेंढ्या चारणाऱ्या धनगर, मेंढपाळ बांधवांना रक्तदानाचे महत्व कळले आहे. नुकताच त्यांनी रक्तदानाचा एक आगळा वेगळा उपक्रम पार पाडला. 

जवळपास 200 मेंढपाळ बांधवांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या वाढदिवस औचित्य साधून मेंढपाळ धनगर विकास मंचाच्या माध्यमातून हे रक्तदान शिबिर मातोश्री वृद्धाश्रमाच्या, माळेगाव (भानखेडा) मागील बाजूला असलेल्या मेंढपाळ धनगरवाड्यात घेतले. मेंढपाळ धनगर बांधवांच्या जीवनशैलीनुसार झालेले हे शिबिर राहुट्यांमध्येच करण्यात येणार होते, मात्र रक्तपेढीतील नियमांनुसार रक्तदानाकरिता इमारत किंवा खोली असणे गरजेचे असते, त्यामुळेच वाड्याच्या आत हे शिबिर घेण्यात आल्याचे संतोष महात्मे यांनी सांगितले. 

हेही वाचा : खासदार बाळू धानोरकरांच्या धमण्यांमध्ये शिवसेनेचे रक्त : खासदार राऊत

रक्तदानाचे महत्व ओळखून धनगर मेंढपाळ बांधवांनी स्वतःच हे शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरातून राज्यात रक्तदानाबाबत जागृतीचा संदेश जावा, हाच यामागील उद्देश आहे.
- संतोष महात्मे, आयोजक तथा संस्थापक अध्यक्ष मेंढपाळ, धनगर विकास मंच. 
 Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख