ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भाऊ लोखंडे यांचे निधन

अनेक संस्थांच्या कार्यकारिणीत विविध पदे भूषविणाऱ्या डॉ. लोखंडे यांचे साहित्यातील योगदान मोठे आहे. विदर्भ साहित्य संघाच्या दलित साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. ‘मराठी संत साहित्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव’ हा त्यांच्या पीएच.डी. शोधप्रबंधाचा विषय होता.
Bhau Lokhande
Bhau Lokhande

नागपूर : रशियातील बौद्धधर्म यासह इतर साहित्याची निर्मिती करणारे ज्येष्ठ साहित्यिक आणि रिपब्लिकन स्टुंडन्ट्स फेडरेशनचे प्रणेते, दलित साहित्याच्या चळवळीत महत्वाचे योगदान दिलेले विचारवंत, दलित चळवळीचे भाष्यकार डॉ. भाऊ लोखंडे यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांचा जन्म १५ जून १९४२ रोजी झाला होता. 

१५ जून २०१७ रोजी वयाची ७५ वर्षे पूर्ण केल्यानिमित्त डॉ. भाऊ लोखंडे अमृत महोत्सवी नागरिक सत्कार समितीच्यावतीने त्यांचा १ जुलै २०१७ रोजी अमृत महोत्सवी सत्कार करण्यात आला होता. नागपुरात आयोजित दुसऱ्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती. एप्रिल ११ व १२ एप्रिल रोजी साई सभागृहात संमेलन होणार होते. डॉ. भाऊ लोखंडे हे नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर पाली प्राकृत विभागाचे रीडर राहिले असून डॉ. आंबेडकर अध्यासनाचे ते पहिले विभागप्रमुख होते. 

अनेक संस्थांच्या कार्यकारिणीत विविध पदे भूषविणाऱ्या डॉ. लोखंडे यांचे साहित्यातील योगदान मोठे आहे. विदर्भ साहित्य संघाच्या दलित साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. ‘मराठी संत साहित्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव’ हा त्यांच्या पीएच.डी. शोधप्रबंधाचा विषय होता. ‘रशियातील बौद्धधर्म’ आदी त्यांचे साहि‌त्य प्रकाशित झाले आहे.

भाऊ लोखंडेंनी लिहिलेली पुस्तके :
· अयोध्या कुणाची? रामाची? बाबराची? की बुद्धाची?
· डॉ. आंबेडकरी हितशत्रूंच्या जाणिवा मराठी संत साहित्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव
· महाकवी अश्वघोषरचित बुद्धचरित्र (संपादित व अनुवादित)
· सौन्दरनन्द महाकाव्यम् (सहलेखिका -रत्नमाला लोखंडे)
· डॉ. आंबेडकरी बावीस प्रतिज्ञा
· बौद्धांचे सण उत्सव आणि मानसिकता
· डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विद्यार्थ्यांना उपदेश, मार्गदर्शन व शिक्षण विषयक विचार.
(Edited By : Atul Mehere) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com