दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला, तरीही ग्रांमपंचायती उदासीनच..  - the second wave hit the rural area yet grampanchayat remained indifferent | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला, तरीही ग्रांमपंचायती उदासीनच.. 

निलेश डोये
सोमवार, 7 जून 2021

बालकांसाठी घातक ठरणारी तिसरी लाट संभाव्य कोरोना लाटेच्या प्रादुर्भावापासून मुंलाना दूर ठेवण्यासाठी कोविड हॉस्पिटलसाठी १५ व्या वित्त आयोगातून शासन २५ टक्के निधी देणार आहे.

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसला. पण यातून ग्रामपंचायतींनी बोध घेतलेला दिसत नाही.  कारण विलगीकरण कक्ष तयार करण्यासाठी ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून २५ टक्के निधी खर्च करण्यास परवानगी दिली आहे. परंतु गेल्या दहा दिवसांत एकाही ग्रामपंचायतीने तसा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे दिला नाही. त्यामुळे विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी ग्रामपंचायत उदासीन असल्याचे दिसते. 

शहरी भागासोबत ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. दुसरी लाट ही पहिल्यापेक्षा ग्रामीण भागासाठी जास्त घातक ठरली. ग्रामीण भागात पुरेशी व्यवस्था नसल्याने रुग्णांचे मोठे हाल झाले. वेळेत उपचाराअभावी अभावी अनेकांचा मृत्यू झाला. त्यामुळे ग्रामीण भागात कोविड केअर सेंटरसोबत विलगीकरण कक्ष निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायतींना निधीची गरज असून शासनाने मदत करण्यासंदर्भात पुढाकार घेण्यात आला होता. याची दखल घेत ३० किंवा त्यापेक्षा जास्त खाटांच्या विलगीकरण कक्षाकरता १५ व्या वित्त आयोगाच्या अबंधित निधीमधील २५ टक्के रक्कम खर्च देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. दहा दिवसांपूर्वी शासनाने याबाबतचा आदेश काढला. परंतु अद्याप एकाही ग्रामपंचायतीने कक्ष तयार करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला दिला नाही. 

१५ व्या वित्त आयोगाचा निधी विलगीकरणा कक्ष तयार करण्यासाठी खर्च करण्यास शासनाने ग्रामपंचायतींना परवानगी दिली आहे. अद्याप याबाबत एकाही ग्रामपंचायतीचा प्रस्ताव आला नाही. आल्यावर नियमानुसार त्यावर निर्णय घेण्यात येईल. 
राजेंद्र भुयार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूर. 

हेही वाचा : गफ्फार मलिक यांना मरणोत्तर जळगावरत्न पुरस्कार

कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अतिशय घातक ठरली. यात अनेक कुटुंबप्रमुखांना आपला जीव गमवावा लागला. आता परत बालकांना घातक ठरणारी लाट येण्याचे भाकीत केले आहे. यासाठी ठोस उपाययोजना सरकार करीत आहे. कोविड हॉस्पिटलसाठी १५ व्या वित्त आयोगातून शासन २५ टक्के निधी देण्याचा निर्णय चांगला आहे. पण ग्रामपंचायतीला कोरोनासुरक्षा निधी मिळावा. 
-इंद्रायणी सुरेश काळबांडे 
सरपंच, डिगडोह. 

बालकांसाठी घातक ठरणारी तिसरी लाट संभाव्य कोरोना लाटेच्या प्रादुर्भावापासून मुंलाना दूर ठेवण्यासाठी कोविड हॉस्पिटलसाठी १५ व्या वित्त आयोगातून शासन २५ टक्के निधी देणार आहे. हा निर्णय अतिशय चांगला आहे. 
-रुपाली प्रवीण खाडे 
सरपंच, डेगमा खुर्द.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख