दुसऱ्या फेरीतही अभिजित वंजारी आघाडीवर, भाजपचा बालेकिल्ला ढासळणार?

अभिजित वंजारी यांनी या निवडणुकीसाठी मोठा संघर्ष केला आहे. दीड ते दोन वर्षांपूर्वीच त्यांची निवडणूक सुरू झाली होती. या निवडणुकीत त्यांच्या विजय झाल्यास हा मोठा इतिहास ठरणार आहे.
Sandeep Joshi -Abhijeet Wanjari.
Sandeep Joshi -Abhijeet Wanjari.

नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मतमोजणीच्या पहिल्या फेरीत कॉंग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी ४८५० मतांची दमदार आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या फेरीतही त्यांनी २४९४ मतांची आघाडी घेतली आहे. अभिजित वंजारी यांची घोडदौड पाहता भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला ढासळतो की काय, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. 

अभिजित वंजारी यांना दुसऱ्या फेरीत २४११४ मते, तर भाजपचे संदीप जोशी यांना १६९५२ मते मिळाली. या फेरीत वंजारी २४९४ मतांना आघाडीवर आहेत. त्यांची मतांची एकूण आघाडी ७३३४ झाली आहे. हा मतदारसंघ भाजपचा गड मानला जातो. अभिजित वंजारी यांनी या निवडणुकीसाठी मोठा संघर्ष केला आहे. दीड ते दोन वर्षांपूर्वीच त्यांची निवडणूक सुरू झाली होती. या निवडणुकीत त्यांच्या विजय झाल्यास हा मोठा इतिहास ठरणार आहे. कारण केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह भाजपच्या दिग्गज नेत्यांना या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे सर्व संघटना आणि राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांसह नागरिकही रात्र जागून अंतिम निकालाची वाट बघत आहेत. 

पदवीधर निवडणुकीत यावेळी महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी थेट लढत झाली. प्रचारादरम्यानही कधी महाविकास आघाडी, तर कधी भाजप मागेपुढे होत राहिले. मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असतानाही नेमका अंदाज कुणाला लावता आलेला नव्हता. त्यामुळे पण गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी मतदानाचा टक्का वाढल्याने लढत अतिशय अटीतटीची झाली. त्यामुळे भाजपचा गढ यावेळी राखला जातो की नाही, याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. त्यामुळे मतदानानंतरही राजकीय जाणकार अंदाज लावायला कचरत होते. पहिल्याच फेरीत अभिजित वंजारींनी आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या फेरीतही कायम ठेवल्याने कॉंग्रेसच्या खेम्यात आनंद तर भाजपच्या गोटात चिंता दिसू लागलीय. 

आजवर भाजपचा या मतदारसंघात पराभव झाला नाही. त्यामुळे भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांच्यासमोर विजयी परंपरा कायम राखण्याचे आव्हान आहे. दुसरीकडे काँग्रेस महाआघाडीने यंदा प्रथमच अ‌ॅड. अभिजित वंजारी यांच्या रूपाने अधिकृत उमेदवार दिला. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे बळ त्यांना मिळाले. याशिवाय त्यांनी सुमारे दीड वर्षाआधीपासून या मतदारसंघात मशागत केली. यंदा बसपाने आपला उमेदवार जाहीर केला नाही. वंचित बहुजन विकास आघाडीचा उमेदवार रिंगणात होता. असे असले तरी यंदा भाजप विरुद्ध काँग्रेस, असा थेट मुकाबला झाला. आता अभिजित वंजारी दुसऱ्या फेरीतही आघाडीवर असल्यामुळे भाजपच्या गढाला सुरूंग लागतो की काय? अशी चर्चा रंगली आहे.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com