शाळा देत आहेत धमक्या, संतप्त पालकांची गडकरींच्या घरासमोर घोषणाबाजी 

शाळा बंद असताना क्रीडा, वाचनालय, संगणक, संगीत शैक्षणिक शुल्क कशासाठी आकारले जात असा सवाल पालकांचा आहे. ऑनलाइन शिक्षण परिणामकारक नाही, वारंवार खंड पडतो, विद्यार्थ्यांचे ऐकून घेण्याची सोय नाही, फक्त होमवर्क करायला सांगण्यात येते. याकरिता लाखो रुपये शुल्क आकारला जात असल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत.
gadkari.
gadkari.

नागपूर : सद्यःस्थितीत शाळा सुरू नाहीत. ऑनलाइन वर्ग घेतले जात आहेत. परंतु तेसुद्धा परिणामकारकरीत्या होत नाहीये आणि शाळांकडून पालकांना शुल्क भरण्यासाठी वारंवार एसएमएस आणि फोन केले जात आहेत. काही शाळांकडून तर शुल्क न भरल्यास विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्याचीही धमकी दिली जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर निदर्शने केली. 

कोरोनामुळे सुमारे सहा महिन्यांपासून शाळा बंद आहेत. त्यापैकी चार महिने शिकवण्यात आलेले नाही. त्यानंतर ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले. त्याकरिता विद्यार्थ्यांना संपूर्ण वर्षाचे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी खाजगी शाळा वारंवार फोन करून पालकांवर दबाव टाकत आहेत. अनेक शाळांनी ऑनलाइन सुविधा बंद केली आहे. शाळेतून काढण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. कोरोनामुळे अनेकांच्या वेतनात कपात करण्यात आली आहे. काहींचे रोजगार गेले आहेत तर व्यवसाय ठप्प झाल्याने व्यापारीसुद्धा अडचणीत आहेत. मात्र खाजगी शाळा काही ऐकून घेण्यास तयार नाहीत. पैसे भरण्यासाठी बाध्य केल्या जात आहे. 

शैक्षणिक शुल्क सवलत द्या, हप्ता पाडून देण्यासही नकार दिला जात आहे. विनंती धुडकावून लावली जात आहे. सरकारी आदेशाला शाळा जुमानत नसल्याने पालकांनी नितीन गडकरी यांच्या वर्धा रोडवरील घरासमोर शाळा संचालकांच्या विरोधात घोषणाबाजी केली. गडकरी यांनी यात मध्यस्थी करावी, अशी मागणी केली. शाळा बंद असताना क्रीडा, वाचनालय, संगणक, संगीत शैक्षणिक शुल्क कशासाठी आकारले जात असा सवाल पालकांचा आहे. ऑनलाइन शिक्षण परिणामकारक नाही, वारंवार खंड पडतो, विद्यार्थ्यांचे ऐकून घेण्याची सोय नाही, फक्त होमवर्क करायला सांगण्यात येते. याकरिता लाखो रुपये शुल्क आकारला जात असल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत.   

 (Edited By : Atul Mehere) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com