जी चूक फडणवीस सरकारने केली होती, तीच ठाकरे सरकारने केली... - the same mistake made by fadanvis government the same by the thackeray government | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

जी चूक फडणवीस सरकारने केली होती, तीच ठाकरे सरकारने केली...

केवल जीवनतारे
बुधवार, 2 जून 2021

तत्कालीन भाजपप्रणित सरकारने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वैद्यकीय शिक्षकांच्या निवृत्तीची वयोमर्यादा ६४ वर नेली.

नागपूर : देवेंद्र फडणवीस सरकार Devendra Fadanvis Governemnt सत्तेत आल्यावर त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ५८ वरून ६० केले होते. यानंतर २०१९ मध्ये पुन्हा निवृत्तीचे वय ६० वरून ६२ करण्याचे धोरण तयार केले. आता ठाकरे सरकारने Thackeray Government त्याच धोरणानुसार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ६२ पर्यंत वाढविले. २०१५ मध्ये फडणवीस सरकारने जी चूक केली होती, तीच चूक ठाकरे सरकारने यावर्षी केली. परिणामी केवळ खुर्चीत बसून कागदी घोडे नाचवणाऱ्या आणि रुग्णाला हातही न लावणाऱ्यांना याचा फायदा झाला. This only benefited those who sat on chairs and danced on paper horses and did not even touch the patient आरोग्य यंत्रणा सक्षम होण्याऐवजी खिळखिळी झाली. 

शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नुकतेच आरोग्य सेवा आयुक्तालयामार्फत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ व राज्य कामगार विमा योजनेतील महाराष्ट्र सेवा गट-अ मधील वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ पदावरील सर्व कार्यरत अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ पर्यंत वाढविले. तसा अध्यादेश ३१ मे रोजी काढण्यात आला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वय वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या संचालक, अतिरिक्त संचालक, सहसंचालक, उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी रुग्णाला हात देखील लावत नाही. केवळ वातानुकूलित कक्षात बसून कागदी घोडे नाचवण्याशिवाय कोणतेही काम करीत नाही, तरीदेखील राज्य शासनाने कोरोनाचे कारण पुढे केले. जी चूक मागील सरकारने २०१५ मध्ये केली तीच चूक सध्याच्या सरकारने २०२१ मध्ये केली. 

राज्यात भाजप-सेना सत्तेवर आल्यानंतर २०१५ मध्ये राज्य शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ५८ वरून ६० केले. यानंतर २०१९ मध्ये पुन्हा याच शासनाने निवृत्तीचे वय ६० वरून ६२ करण्याचे धोरण तयार केले. त्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागात टॉपवर बसलेल्या अधिकाऱ्यांनी जुगाड टेक्नॉलॉजीचा चांगलाच वापर केला. कोरोनाचे कारण पुढे करीत सार्वजनिक आरोग्य विभागातील १९३ डॉक्टरांच्या खुर्च्यांना वयवाढीचा लाभ दिला. या वयवाढीचा सर्वाधिक लाभ रुग्णाला हात न लावणाऱ्या वातानुकूलित कक्षातील खुर्चीत बसून केवळ कागदी घोडे नाचवणाऱ्या वरिष्ठांना झाला आहे. 

हेही वाचा : अदर पूनावालांना धमक्या अन् उच्च न्यायालयाकडून ठाकरे सरकारला आदेश

पदोन्नतीच्या प्रतीक्षेतील डॉक्टरांमध्ये असंतोष 
तत्कालीन भाजपप्रणित सरकारने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वैद्यकीय शिक्षकांच्या निवृत्तीची वयोमर्यादा ६४ वर नेली. तसेच राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाअंतर्गत येणारी सामान्य रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयापासून तर प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे, कामगार रुग्णालयातही वरिष्ठ डॉक्टरांचे वय वाढवण्याचा निर्णय शासनाने दोन वेळा घेतला. मात्र पदोन्नतीच्या उंबरठ्यावर असलेल्यांसाठी वय वाढीचा निर्णय घातक ठरला आहे. ज्या पदावर आहेत, त्याच पदावरून ते निवृत्त होतील. यामुळे त्यांच्यामध्ये असंतोष भडकला आहे.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख