साहिलने प्रेयसीलाच दिली बदनामीची धमकी, अन हडपला फ्लॅट 

ऑगस्ट २०१९ मध्ये साहिल, त्याची खास मैत्रीण निलिमा जयस्वाल, भाऊ तौफीक सैयद आणि जूबेर हे रियाच्या घरी आले. तिच्याशी बळजबरी केली. मारहाण केल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी दिली. कोऱ्या स्टॅंपपेपरवर सह्या घेतल्या. फ्लॅटचे दस्तावेज हिसकावून घेतले.
Sahil Sayyed
Sahil Sayyed

नागपूर : महापौर संदीप जोशी आणि ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवण्याबाबतची आॅडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर रातोरात चर्चेत आलेला ठकबाज साहिल खुर्शीद सैय्यद याने एका फ्लॅटसाठी आपल्या प्रेयसीलाही सोडले नाही. साहिलची नजर एका फ्लॅटवर होती. तो हडपण्यासाठी त्याने फ्लॅटमालक विवाहित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि बदनामी करण्याची धमकी देऊन तिचा फ्लॅट हडपला. या कारस्थानात साहिलची खास मैत्रीण निलिमा जयस्वालचाही सहभाग आहे. 

या प्रकरणी साहिलसह चौघांवर हुडकेश्‍वर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. यामध्ये साहिलची खास मैत्रीण निलीमा जयस्वालचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेसा पावर हाऊसच्या मागे शिला अपार्टमेंटमधील ३०२ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये राहणारी ३५ वर्षीय पिडीत महिला रियाची (नाव बदललेले) २०१३ ला साहिलसोबत ओळख झाली. साहिलने अविवाहित असल्याचे सांगून रियाशी मैत्री केली. तिला मोठमोठी स्वप्ने दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ‘तुझ्याशी लग्न करून तुला राणी बनवून ठेवेल’ असे आमिष दाखवले. त्याच्या प्रेमात वेडी झालेली रिया त्याने म्हटल्याप्रमाणे वागत होती. 

साहिलने रीयाला फ्लॅट नावावर करून मागितला. मात्र रियाने त्यासाठी नकार दिला. साहिलने चिडून रियाला जबरजस्त मारहाण केली. फ्लॅट नावे न केल्यास अनैतिक संबंधावरून बदनामीची धमकी साहिलने रियाला दिली. ऑगस्ट २०१९ मध्ये साहिल, त्याची खास मैत्रीण निलिमा जयस्वाल, भाऊ तौफीक सैयद आणि जूबेर हे रियाच्या घरी आले. तिच्याशी बळजबरी केली. मारहाण केल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी दिली. कोऱ्या स्टॅंपपेपरवर सह्या घेतल्या. फ्लॅटचे दस्तावेज हिसकावून घेतले. अशाप्रकारे रियाची फसवणूक करीत तिचा फ्लॅट हडपला. हुडकेश्‍वर पोलिसांनी या प्रकरणी साहिलसह चौघांवर गुन्हे दाखल केले आहे.     (Edited By : Atul Mehere) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com