तेव्हा "साहेब' म्हणाले होते, आशिषला आवाज द्या...! 

अॅड. आशिष यांच्या पहिल्या टर्ममधील अध्यक्षीय कामगिरीने प्रभावित होऊन दुसऱ्या टर्ममध्ये त्यांना महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हा व तालुका ठिकाणावरून महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या सदस्यपदी सर्वाधिक मतांनी विधिज्ञांनी निवडून दिले. या क्षेत्रातील कामगिरी पाहूनच आशिष देशमुख यांच्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या लीगल सेलची जबाबदारी शरद पवारांनी सोपवली.
Sharad Pawar - Ashish Deshmukh
Sharad Pawar - Ashish Deshmukh

पुसद (जि.यवतमाळ) ः महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेच्या वेळी कायदेविषयक बाबींमध्ये ऍड. आशिष देशमुख यांनी प्रभावी भूमिका वठवली होती. सत्ता स्थापनेदरम्यान कायदेशीर पेचप्रसंग आले होते. तेव्हा पत्रकार परिषदेत त्यावर आशिष देशमुख बोलतील, "आशिषला आवाज द्या', अशी हाक शरद पवार यांनी मारली होती. या प्रसंगातून पवार साहेबांचा विश्वास त्यांनी कमावला, हेच स्पष्ट होते, अशी प्रतिक्रीया "साहेबां'ना जाणणाऱ्यांनी तेव्हा दिली होती. विधान परिषदेवर वर्णी लागण्यासंदर्भात सोशल मिडीयावरील चर्चेत ऍड. आशिष यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे ऍड. आशिष यांच्या रुपाने पुसदला चौथा आमदार मिळेल, अशी आशा त्यांच्या समर्थकांना आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुसद येथील निकटतम कार्यकर्ते माजी आमदार दिवंगत डॉ. पंजाबराव देशमुख यांचे चिरंजीव आणि प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या लीगल सेलचे अध्यक्ष ऍड. आशिष पंजाबराव देशमुख यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विधान परिषदेवर वर्णी लागणार का? याबद्दल सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांना आमदारकी मिळेल तेव्हा मिळेल, पण सोशल मिडीयातील चर्चेत मात्र आशिष यांनी बाजी मारल्याचे आज तरी दिसते. त्यांच्या उमेदवारीसाठी मुंबई येथील वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेऊन वकिलांना प्रतिनिधित्व देण्याची मागणी केली आहे. 

शरद पवार यांची तरुण, उमद्या आशिष देशमुख यांच्यावर खास मर्जी असून आशिष देशमुख हे सध्या महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य आहे. यापूर्वी त्यांनी या कौन्सिलच्या अध्यक्षपदाची धुरा अतिशय समंजसपणे व कर्तबगारीने सांभाळली. या दरम्यान आशिष देशमुख यांची शरद पवारांसोबत अधिक जवळीक निर्माण झाली. "शिक्षक, विद्वतजन यांच्यासोबतच राज्यातील विधिज्ञांचा एक प्रतिनिधी विधान परिषदेवर असावा', याबाबतीत आशिष देशमुख यांनी शरद पवार यांच्याजवळ प्रांजळ मत व्यक्त केलेले होते. 

महाराष्ट्रात विधानपरिषदेचे राज्यपाल नियुक्त 12 सदस्य निवृत्त होत आहेत. या रिक्त जागांपैकी चार जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला येणार असून त्यावर ऍड. अशिष देशमुख यांना विधान परिषदेवर प्रतिनिधित्व मिळावे, अशी राज्यातील कायदेतज्ज्ञ तसेच त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा आहे. आशिष देशमुख यांचे वडील डॉ. पंजाबराव देशमुख सुरुवातीच्या काळापासून शरद पवार यांच्यासोबत होते. या दोन घराण्यांतील संबंधातून डॉ.पंजाबराव यांची विधान परिषदेवर व नंतर महाराष्ट्र राज्य वीज मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. एक सालस राजकारणी म्हणून पंजाबराव यांची छबी होती. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत समंजस व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून राज्यात आशिष देशमुख यांनी महाराष्ट्र बार कौन्सिलच्या माध्यमातून आपली प्रतिमा निर्माण केली. 

पहिल्या टर्ममधील त्यांच्या अध्यक्षीय कामगिरीने प्रभावित होऊन दुसऱ्या टर्ममध्ये त्यांना महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हा व तालुका ठिकाणावरून महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या सदस्यपदी सर्वाधिक मतांनी विधिज्ञांनी निवडून दिले. या क्षेत्रातील कामगिरी पाहूनच आशिष देशमुख यांच्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या लीगल सेलची जबाबदारी शरद पवारांनी सोपवली. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेदरम्यान कायदेविषयक बाबींमध्ये आशिष देशमुख यांनी प्रभावी भूमिका वठवली. सत्ता स्थापनेदरम्यान कायदेशीर पेचप्रसंग आले होते. पत्रकार परिषदेत त्यावर आशिष देशमुख बोलतील, "आशिषला आवाज द्या' अशी शरद पवार यांनी हाक मारली. या प्रसंगातून पवार साहेबांचा विश्वास त्यांनी कमावला, हेच स्पष्ट होते, अशी साहेबांना जाणणाऱ्यांची प्रतिक्रिया होती. 

संघटन कौशल्य, पवार साहेबांवरील निष्ठा, समंजस व अभ्यासू युवा नेतृत्व लाभलेल्या आशिष देशमुखांना विधान परिषदेवर संधी मिळाल्यास राज्यातील विधिज्ञांचा मोठा वर्ग राष्ट्रवादी कॉंग्रेसला अनुकूल होऊ शकतो, अशी त्यांच्या चाहत्यांची प्रतिक्रिया आहे. तसे झाल्यास विधानसभा सदस्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार इंद्रनील मनोहर नाईक, भाजपाचे विधानपरिषद सदस्य आमदार निलय नाईक व कॉंग्रेस पक्षाचे विधानपरिषद सदस्य आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्यासोबत चौथे युवा व उच्चशिक्षित आमदार आशिष देशमुख यांच्या रूपाने पुसदला मिळतील, यात शंका नाही. एक जागा राजू शेट्टी यांना गेल्या नंतर उर्वरित तीन जागांसाठी मोठी स्पर्धा आहे. त्यात कुणाला संधी मिळणार, हे मात्र सर्वस्वी शरद पवार यांच्या निर्णयावर अवलंबून राहणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com