राज्यकर्तेच करत नाहीत आदेशाची अंमलबजावणी, कोरोनासाठी नाही दिला निधी ! - the rulers do not implement the order no funds were given to corona | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

राज्यकर्तेच करत नाहीत आदेशाची अंमलबजावणी, कोरोनासाठी नाही दिला निधी !

निलेश डोये
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

प्रत्येक आमदाराला २० लाखांचा फंड आरोग्य विभागाला द्यायचा होता. परंतु गृहमंत्री अनिल देशमुख आणि आमदार समीर मेघे यांच्या व्यतिरिक्त एकाही आमदारांनी आपला फंड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला दिला नाही. निधी देणाऱ्यांमध्ये एक राष्‍ट्रवादी  काॅंग्रेस आणि एक भाजपचे आमदार आहेत.

नागपूर : कोरोनाशी लढा देण्याकरता आवश्यक साहित्य खरेदीसाठी आमदारांनी २० लाखांचा फंड आरोग्य विभागाला द्यावा, असे आदेश शासनाने दिले होते. पण जिल्ह्यातील केवळ दोन आमदार वगळता, कुणीही कोरोनासाठी अद्याप निधी दिलेला नाही. यामध्ये मंत्र्यांचाही समावेश आहे. त्यामुळे राज्यकर्तेच आदेशाची अंमलबजावणी करीत नसल्याचे दिसतेय. याशिवाय विरोधी पक्ष भाजपच्याही आमदारांनी कोरोनासाठी निधी दिलेला नाही. त्यामुळे साहित्याअभावी कोरोनाविरोधात योद्धे लढणार कसे, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.  

मार्च महिन्यात कोरोनाचे रुग्ण समोर आले. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारने चक्क लॉकडाउन केले. सरकारच्या महसुलावर परिणाम झाल्याने अर्थसंकल्पाला कात्री लावण्याची वेळ आली. एप्रिल महिन्यात शासनाने आमदार फंडाचा पहिला २० लाखांचा हप्ता देण्यात आला. आरोग्याकरता निधी कमी पडता कामा नये म्हणून आमदार फंडातील २० लाख रुपये कोरोनासाठी आवश्यक साहित्य आणि उपाययोजनांसाठी आरोग्य विभागाला देण्याचा निर्णय वित्त विभागाने घेतला होता. नागपूर जिल्ह्यात १२ विधानसभा तर तीन विधान परिषद असे १५ आमदार आहेत. यात तीन मंत्री आणि विरोधी पक्ष नेत्यांचाही समावेश आहे. 

प्रत्येक आमदाराला २० लाखांचा फंड आरोग्य विभागाला द्यायचा होता. परंतु गृहमंत्री अनिल देशमुख आणि आमदार समीर मेघे यांच्या व्यतिरिक्त एकाही आमदारांनी आपला फंड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला दिला नाही. निधी देणाऱ्यांमध्ये एक राष्‍ट्रवादी  काॅंग्रेस आणि एक भाजपचे आमदार आहेत. हे दोन्ही नेते ग्रामीण भागातील आहे. ग्रामीण भागात दोन भाजप, दोन कॉंग्रेस तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे एक-एक आमदार आहेत. विधान परिषदेतील तीनही सदस्य भाजपचे आहेत. कॉंग्रेसच्या एकही आमदारांनी आपला फंड दिला नाही. यात एकामंत्र्यांचा सुद्धा समादेश आहे. निर्णय घेणाऱ्यांकडूनच आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसते.

(Edited By : Atul Mehere) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख