"नथीच्या नखऱ्यावर' पडतोय भारी "रूबाब वर्दीचा' 

नथीचा नखरा किंवा नऊवारी साडीत फोटो काढणे जमत नाही. ड्यूटीमुळे तेवढा वेळही आमच्याकडे नसतो. त्याची खंत नाही. अंगावर खाकी वर्दी चढविली की मान गर्वाने ताठ होते आणि कर्तव्यावर जाताना अगदी ऊर भरून येतो.
Khaki
Khaki

नागपूर : सध्या सोशल मीडियावर वेगवेगळा ट्रेंड सुरू आहे. त्यामध्ये विशेषतः "नथीचा नखरा..' "नवरा माझा नवसाचा...' "झुकी झुकी नजर..' आणि फोटो विथ सन-डॉटर', "फिर मुस्कुरायेगा इंडिया' असा पाप्युलर ट्रेंड सुरू आहे. महिलांनी नववारी साडी नेसून नाकात नथ घालून तर कुणी नवऱ्यासोबत किंवा मुलासोबत फोटो व्हॉट्‌सऍप स्टेटसला ठेवून आपापली हौस पूर्ण करून घेतली. या ट्रेंडला महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. त्यातच कोरोनामुळे आता चोवीस तास बंदोबस्तात तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनीही मोठा भाव खाल्ला आहे. त्यांच्याही कार्याची कुणीतरी दखल घ्यावी, म्हणून सोशल मीडियावर "रूबाब वर्दीचा' ट्रेंड सुरू केला. या ट्रेंडची सोशल मीडियावर चांगली चर्चा असून अनेकांनी या ट्रेंड आणि पोलिस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. 

काही जण मन मोकळं करण्यासाठी तर अनेक जण लिहिण्यासाठी प्लॅटफार्म म्हणून सोशल मीडियाकडे पाहतात. परंतु, आता नवीनच फॅड सोशल मीडियावर सुरू झाले आहे. व्हॉट्‌सऍपवर स्टेटस ठेवायचे आणि त्यातून कुणालातरी चॅलेंज द्यायचे. मित्र-मैत्रिणींना चॅलेंज देऊन छानसा फोटो स्टेटसला ठेवण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे. अशातच "नथीचा नखरा' हॅशटॅगसह अनेकांनी सोशल मीडियावर चॅलेंज टाकले. एकामागून एक मुलींनी आणि महिलांनी नाकात नथ घालून असल्याचे फोटो काढण्याची हौस भागवून घेतली. "झुकी झुकी नजर' या चॅलेंजमध्ये अनेकांनी विशेषतः तरुणींनी डोळ्यावर केसाची बट आणि चेहऱ्यावर "हल्की स्माईल' ठेवून काढलेल्या फोटोंनी व्हॉट्‌सऍप भरून गेले होते. 

हा सर्व ट्रेंड सुरू असताना पोलिस विभागानेही आपला स्वतःचा ट्रेंड सुरू केला. "रूबाब खाकीचा'. उपराजधानीत पाहता-पाहता हा ट्रेंड एवढा चालला की अनेक पोलिस कर्मचारी आणि महिला कर्मचारी आपला कडक खाकी वर्दीवरचा फोटो स्टेटसला ठेवत आहेत. एवढेच नव्हे तर भारी रूबाबातील फोटो व्हॉट्‌सऍपला डीपीसुद्धा ठेवत आहेत. यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य आले आहे. "रूबाब वर्दीचा' या चॅलेंजमुळे सध्या उपराजधानीतील पोलिस मनोमन सुखावत आहेत. 

आम्हाला नेहमी वर्दीवर राहावे लागते. त्यामुळे नथीचा नखरा किंवा नऊवारी साडीत फोटो काढणे जमत नाही. ड्यूटीमुळे तेवढा वेळही आमच्याकडे नसतो. त्याची खंत नाही. अंगावर खाकी वर्दी चढविली की मान गर्वाने ताठ होते आणि कर्तव्यावर जाताना अगदी ऊर भरून येतो. मात्र, आता "रूबाब वर्दीचा' या ट्रेंडमुळे मनातील इच्छा पूर्ण झाली. कडक खाकी वर्दीवर छानसा फोटो ठेवून हौस पूर्ण केली, याचे समाधान आणि आनंद आहे. 
- एक महिला पोलिस कर्मचारी 

खाकी आमची शान आहे. इतर कशापेक्षा खाकी वर्दीवर आमचे जास्त प्रेम आहे. त्यामुळे फक्‍त चॅलेंज म्हणून नव्हे तर आमच्या खाकीवर आम्हाला अभिमान आहे. डीपीवर मुलीचा फोटो ठेवला होता, परंतु "रूबाब वर्दीचा' या चॅलेंजमुळे कडक वर्दीवर फोटो ठेवला आहे. 
- सहायक पोलिस निरीक्षक (नागपूर पोलिस) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com