रासप नेत्यांनी धरली राष्ट्रवादीची वाट, नेत्यांचा प्रवेश..

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी अस्तित्वात आणली. अतिशय कौशल्याने त्यांनी ही राजकीय खेळी केली. त्यानंतर राज्यावर पकड घट्ट करण्यासाठी संघटन मजबूत करण्याकडे लक्ष वळवले.
Ajit Pawar at party
Ajit Pawar at party

नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्यात आपली पकड घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. राष्ट्रवादी आघाडीत सहभागी आहे. त्यामुळे शिवसेना आणि कॉंग्रेसचे नेते, कार्यकर्त्यांना पक्षात घेण्यास मर्यादा आहे. म्हणून आता इतर पक्षांतील नेत्यांना गळाला लावून राज्यात पक्ष मजबूत करण्याचे काम राष्ट्रवादीकडून सुरू असल्याचे बोलले जात आहे. 

नुकतेच राष्ट्रीय समाज पक्षाच्या काही नेत्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि राज्याचे अन्न व औषध पुरवठा मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष राजपूत यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राजपूत यांच्यासह हिंगोली जिल्ह्याचे रासप नेते कोंडिबा म्हस्के, वाशिम जिल्ह्यातील धनगर समाजाचे ज्ञानेश्वर मुखमाले तसेच विश्व भंडारी समाजाचे संस्थापक जयंत पाटकर, रासपचे कोकण संपर्क प्रमुख शैलेश पांजरी, रासप नेते सुमोत जाधव यांचाही राष्‍ट्रवादीत प्रवेश झाला. यावेळी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे उपस्थित होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी अस्तित्वात आणली. अतिशय कौशल्याने त्यांनी ही राजकीय खेळी केली. त्यानंतर राज्यावर पकड घट्ट करण्यासाठी संघटन मजबूत करण्याकडे लक्ष वळवले. महाविकास आघाडीतील सहकारी पक्षांच्या काही कार्यकर्त्यांनी मागील काळात राष्ट्रवादीत प्रवेश घेतल्यानंतर मोठे वादंग माजले होते. त्यामुळे राष्ट्रवादीने सहकारी पक्ष सोडून इतर पक्षांकडे आपला मोर्चा वळवला असल्याचे बोलले जाते. 

रासप नेत्यांचा राष्ट्रवादी प्रवेश हा राष्ट्रवादीच्या नव्या रणनीतीचा एक भाग असल्याचेही राजकीय जाणकार सांगतात. यानंतरही राष्ट्रवादीत इनकमींग सुरू राहणार असल्याचेही राष्ट्रवादी प्रदेशचे नेते सांगतात. त्यामुळे ही भविष्यात होणाऱ्या निवडणुकांची तयारी असल्याचेही सांगितले जाते. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com