निवृत्त न्यायाधीश करतील माझ्यावरील आरोपाची चौकशी, सत्य लवकरच कळेल...  - retired judges will investigates the allegation against me the truth will be known soon | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

निवृत्त न्यायाधीश करतील माझ्यावरील आरोपाची चौकशी, सत्य लवकरच कळेल... 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 28 मार्च 2021

पदावर असेपर्यंत गृहमंत्र्यांची चौकशी होऊच शकत नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मात्र, त्यांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचे सरकारला वाटते. या प्रकरणामुळे राज्याची मोठी बदनामी झाली आहे. मात्र, सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर याचे खापर फोडत असल्याचे दिसत आहे. मात्र, अद्याप यातून काहीही निष्पन्न झालेले नाही.

नागपूर : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना माझ्यावर गंभीर आरोप केला आहे. तसे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. या आरोपाची चौकशी करावी, अशी मागणी मी स्वतः कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना केली आहे. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आता या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. त्यामुळे सत्य काय ते लवकरच जनतेसमोर येईल, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज नागपुरात येताच विमानतळावर पत्रकारांना सांगितले. 

परमबीर सिंग यांनी माझ्यावर केलेले आरोप एकदम चुकीचे आहेत. मला व महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी असे आरोप करण्यात येत आहेत. माझ्यावर मुंबईच्या माजी पोलिस आयुक्तांनी जे आरोप केले आहेत, त्याची चौकशी करावी, अशी मागणी मी स्वतःच केल्यामुळे आता इतर चर्चा करण्यात अर्थ नाही, असेही गृहमंत्री देशमुख म्हणाले. गृहमंत्र्यांना महिन्याला शंभर कोटींचे टार्गेट दिल्याचा आरोप करणारे पत्र मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले होते. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी विरोधकांनी आंदोलन पुकारले. मात्र, महाविकास आघाडीने अद्याप त्यांचा राजीनामा घेतलेला नाही.

पदावर असेपर्यंत गृहमंत्र्यांची चौकशी होऊच शकत नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मात्र, त्यांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचे सरकारला वाटते. या प्रकरणामुळे राज्याची मोठी बदनामी झाली आहे. मात्र, सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर याचे खापर फोडत असल्याचे दिसत आहे. मात्र, अद्याप यातून काहीही निष्पन्न झालेले नाही.

आता या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केल्याचे अनिल देशमुख म्हणाले. या आरोपाची चौकशी रिटायर्ड हायकोर्ट जज यांच्या मार्फत होणार आहे. जे काही सत्य आहे ते जनतेसमोर येईल, असेही त्यांनी सांगितले. आता विरोधक यावर काय प्रतिक्रिया देतात याची प्रतीक्षा आहे. मात्र, या प्रकरणामुळे राज्याची बदनामी झाली, येवढे मात्र खरे.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख