महापालिकेत रंगतोय आयुक्त-लोकप्रतिनीधी सामना, अन रुग्णसंख्या 600 पार 

उपराजधानीसाठी हा आठवडा धोकादायक ठरला आहे. अवघ्या सहा दिवसांत बाधितांची संख्या झपाट्याने वाढली आहे. नागपूर जिल्ह्यात तब्बल 144 नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे. 29 मे रोजी सर्वाधिक 47 रुग्ण आढळले. यापाठोपाठ 30 मे रोजी 13, 31 मे रोजी 19, 1 जून रोजी 19 आणि 2 जून रोजी 20 रुग्ण 3 जून रोजी 24 रुग्णांची भर पडली आहे.
Nagpur Joshi-Mundhe
Nagpur Joshi-Mundhe

नागपूर : महापालिकेत महापालिका आयुक्त आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील सामना चांगलाच रंगत आहे, तर दुसरीकडे शहरात कोरोना विषाणूचे संकट गडद होत चाललेय. दर दिवसाला कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अचानक वेग घेत असल्याचे चित्र काल दिसून आले. एकाच दिवशी उपराजधानीतील 18 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल प्रयोगशाळेतून आल्यामुळे प्रशासन हादरले आहे. यामुळे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 601 वर पोचली. 

विशेष असे की, भगवाननगर परिसरातील 71 वर्षीय वृद्ध सारीच्या आजारासाठी दाखल झाला होता. मात्र, त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे निदान झाले. त्यामुळे प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. विदर्भातील कोरोनाचे संकट अधिक गडद होत असताना अकोला जिल्हा विदर्भात कोरोनाबाधितांमध्ये टॉपवर आहे. त्या खालोखाल आता नागपूर आले आहे. सहाशे पार कोरोनाबाधितांचा टप्पा ओलांडल्याने प्रशासन हतबल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अकोला आणि नागपूर या दोनच जिल्ह्यांनी 600 बाधितांचा टप्पा तीन महिन्यात ओलांडला. बुधवारी एम्स, मेडिकल आणि मेयोच्या प्रयोगशाळेतून आलेल्या 14 कोरोनाबाधितांमध्ये बांगलादेश टॉपवर आहे. 

गेल्या तीन महिन्यांतील आकडेवारीवर नजर टाकल्यास मोमिनपुरा कोरोनाचा हॉटस्पॉट अजूनही कायम आहे. 217 पेक्षा अधिक कोरोनाबाधित एकट्या मोमिनपुऱ्यातील आहेत. त्यापाठोपाठ सतरंजीपुरा, नाईक तलाव, बांगलादेश, टिमकी हंसापुरी, शांतीनगर असा क्रम आहे. नव्याने बजाजनगर येथील एक परिचारिका आढळल्यामुळे बजाजनगरवर पोलिसांची नजर आहे. आज आढळलेल्या बाधितांमध्ये आमदार निवासातील विलगीकरणासह विधी महाविद्यालयाच्या वसतिगृह विलगीकरण केंद्रातील व्यक्तिंचा समावेश असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मेयोच्या प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात कोरोनाबाधित आलेले सर्व रुग्ण हे सहवासात आलेल्यांपैकी आहेत. 

पूर्वी सतरंजीपुऱ्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तयार झाली होती. त्याच धर्तीवरची साखळी नाईक तलाव आणि बांगलादेश या वस्त्यांमध्ये दिसून येत असल्याचे प्रशासन सांगत आहे. बुधवारच्या नवीन बाधितांमध्ये 9 जण लॉ कॉलेज चौकातील वसतिगृहात विलगीकरणात होते. त्यातील 6 जण बांगलादेश आणि 2 जण नरखेड परिसरातील रहिवासी आहेत. तर 5 बाधित आमदार निवासातील विलगिकरण केंद्रातील आहेत. हे सर्व मोमीनपुरातील रहिवासी आहेत. मेडिकलला उपचार घेणाऱ्या दोघांनाही कोरोना असल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले. एम्सच्या प्रयोगशाळेतही गोळीबार चौकातील एक तर खासगी प्रयोगशाळेच्या चाचणीतही हंसापुरीतील एकाला विषाणूची बाधा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे एकाच दिवशी पुन्हा नागपुरात 19 नवीन बाधित वाढले. 

सहा दिवसांत 142 रुग्णांची भर 
उपराजधानीसाठी हा आठवडा धोकादायक ठरला आहे. अवघ्या सहा दिवसांत बाधितांची संख्या झपाट्याने वाढली आहे. नागपूर जिल्ह्यात तब्बल 144 नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे. 29 मे रोजी सर्वाधिक 47 रुग्ण आढळले. यापाठोपाठ 30 मे रोजी 13, 31 मे रोजी 19, 1 जून रोजी 19 आणि 2 जून रोजी 20 रुग्ण 3 जून रोजी 24 रुग्णांची भर पडली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com