राणे फॅमिली सुसाईड मिस्ट्री; धीरजच्या नात्यातील महिलाही होत्या त्रस्त  - rane family suicide mystery dhiraj was harassing to his relative women | Politics Marathi News - Sarkarnama

राणे फॅमिली सुसाईड मिस्ट्री; धीरजच्या नात्यातील महिलाही होत्या त्रस्त 

अनिल कांबळे
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

धीरज याच्या वडिलांचा तो तीन वर्षांचा असताना मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या आईने त्याला आत्याकडे सोपवले. आजवर धीरज हा अनाथ होता, अशी माहिती समोर येत आहे. पण, आता त्याची आई व बहीणही समोर आली आहे. आई-बहीण आजवर त्याच्यापासून का दूर होती, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नागपूर : कोरोडीतील राणे कुटुंब आत्महत्या प्रकरणी एक-एक पात्र समोर येऊ लागले आहे. परवा परवा प्रा. धीरजची आईची एंट्री झाल्यानंतर काल त्याची बहीण अचानक समोर आली. त्यामुळे पोलीसांना तपासाची दिशा वारंवार बदलावी लागत आहे. धीरज राणे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता आणि त्याचा स्वभाव महिलांशी लगट करण्याचा होता. नात्यातील महिलांनाही त्याचा त्रास होता, असे आता तपासात निष्पन्न होत आहे. 

प्रा. धीरज नात्यातील महिलांनाही एकट्यात भेटणे व चित्रपट पाहण्याला चलण्याची मागणी घालणारे संदेश पाठवत होता. कोराडी पोलीस ठाण्यांतर्गत घडलेल्या चार लोकांच्या मृत्यू प्रकरणात दररोज वेगवेगळी माहिती समोर येत आहे. घटनास्थळावरून पोलिसांना डॉ. सुषमा राणेने लिहिलेली चिठ्ठी सापडली. त्यात तिने सामूहिकपणे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला असून चिठ्ठीच्या शेवटी सर्वांची नावे लिहिली आहेत. पण, पती कोणत्या कारणामुळे तणावात होता, हे स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवालात तिघांच्या मृत्यूचे कारण राखून ठेवण्यात आले असून डॉ. सुषमाच्या मृत्यूचे कारण गळफास हे देण्यात आले आहे. 

धीरज हा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक होता. त्या ठिकाणी असलेल्या इतर महिला सहकाऱ्यांशी तो लगट करण्याचा प्रयत्न करीत होता. त्याशिवाय नात्यातील महिलांनाही संदेश पाठवून एकांतात भेटण्याची व चित्रपट बघायला जाण्यासाठी विचारत होता. पण, कोणत्याही महिलेने त्याला भाव दिलेला नाही. पोलिसांनी नोंदवलेल्या जबाबातून तो चरित्रहीन असल्याची बाब समोर येत आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. 

बहीणही आली समोर 
धीरज याच्या वडिलांचा तो तीन वर्षांचा असताना मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या आईने त्याला आत्याकडे सोपवले. आजवर धीरज हा अनाथ होता, अशी माहिती समोर येत आहे. पण, आता त्याची आई व बहीणही समोर आली आहे. आई-बहीण आजवर त्याच्यापासून का दूर होती, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पण, त्याच्या आत्यानेच त्यांना भेटू दिले नाही, असे आई व बहीण आरोप करतात. तर पतीच्या मृत्यूनंतर धीरजच्या आईने दुसरा विवाह करून मुलाला आपल्याकडे सोपवले होते. त्यामुळे त्यांनी कधी त्यांना भेटण्याचा प्रयत्नच केला नाही, अशी माहिती आत्याने पोलीस जबाबात दिली आहे. त्याच्या आत्याला पोलिसांनी आज पुन्हा बोलावून घेतले आहे.     (Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख