रामदास आठवले ज्योतिष्यांच्या पंक्तीत जाऊन बसले : विजय वडेट्टीवार 

महाविकास आघाडी सरकार मजबूत आहे. नव्हे हा आता फेव्हिकॉलचा मजबूत जोड झालेला आहे. कितीही ओढा, कितीही ताणा विरोधकांनी कसेही प्रयत्न केले तरी आमच्या सरकारला काहीही धोका नाही. सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल.
Vijay Vadettiwar - Ramdas Athavale
Vijay Vadettiwar - Ramdas Athavale

नागपूर : रामदास आठवलेंची विचारधारा सातत्याने बदलत आली आहे. आता त्यांची विचारधारा ज्योतिष्यांच्या वळणावर गेलेली आहे. ज्या पक्षासोबत ते सत्तेत आहेत, ते लोक ज्योतिष्यांवरच विश्‍वास ठेवणारे आहेत. त्यामुळे भविष्यवाणी करणं, हे आता आठवलेंच्या अंगवळणी पडलं किंबहुना तशी सुरुवात झालेली आहे, असे बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार आज म्हणाले.  

गणपती विसर्जनाच्या नंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारचे विसर्जन होईल, असे वक्तव्य अलीकडेच रामदास आठवलेंनी केले होते. त्यांच्या वक्तव्याचा आज मंत्री वडेट्टीवार यांनी चांगलाच समाचार घेतला. ज्योतिषी बनण्याची तयारी, त्याचा सराव आणि पंचांग वाचण्याचं काम आठवलेंनी बहुधा सुरू केलं असावं. म्हणूनच त्यांना असली भविष्यवाणी करावीशी वाटली असणार, असा टोला वडेट्टीवार यांनी रामदास आठवलेंना हाणला. केवळ सत्तेसाठी आठवलेंनी आपल्या विचारांना तिलांजली दिलेली आहे. महाराष्ट्रातील सरकार पाडण्याच्या अयशस्वी प्रयोगाचा एक भाग ते होऊ पाहत आहेत. पण असली भाकितं करून सरकार पडणे हे त्यांचे दिवास्वप्नच ठरणार आहे, असेही ते म्हणाले. 

‘हा’ आता फेव्हीकॉलचा मजबूत जोड झाला आहे
महाविकास आघाडी सरकार मजबूत आहे. नव्हे हा आता फेव्हिकॉलचा मजबूत जोड झालेला आहे. कितीही ओढा, कितीही ताणा विरोधकांनी कसेही प्रयत्न केले तरी आमच्या सरकारला काहीही धोका नाही. सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल आणि जनविकासाची कामे करीत राहील, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com