लॅपटॉप, मोबाईल, कागदपत्रे जमा करण्याची प्रक्रिया वेगात... - procedure of collection of laptop, mobile and documents is become fast | Politics Marathi News - Sarkarnama

लॅपटॉप, मोबाईल, कागदपत्रे जमा करण्याची प्रक्रिया वेगात...

सरकारनामा ब्यूरो 
रविवार, 28 मार्च 2021

कागदपत्रे जमा करण्याच्या प्रक्रियेने आता वेग घेतला आहे. दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत काही लोक उपवनसंरक्षक शिवकुमारचे कान भरत होते, असे नमूद केल्याने ते कोण आहेत, याचा शोधसुद्धा घेतला जाईल.

धारणी (जि. अमरावती) : दीपाली चव्हाण यांनी २५ मार्चला हरिसाल येथील शासकीय निवासस्थानात गोळी झाडून आत्महत्या केली होती. या प्रकरणात उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला स्थानिक न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर पुराव्यासाठी लॅपटॉप, मोबाईल, कागदपत्रे जमा करण्याच्या प्रक्रियेने आता वेग घेतला आहे. दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत काही लोक उपवनसंरक्षक शिवकुमार यांना दीपालींच्या विरोधात भडकवत होते, असा उल्लेख केला आहे. हे लोक कोण, याचाही तपास आता केला जाणार आहे. 

दीपाली यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चार पानांच्या चिठ्ठीत उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्याकडून होणाऱ्या त्रासाचा उल्लेख केला होता. शुक्रवारी पोलिसांनी शिवकुमारला अटक करून काल धारणीच्या न्यायालयात हजर केले. तपासासाठी शिवकुमारला ३० मार्चपर्यंत पोलिस कोठडी देण्याची विनंती पोलिसांनी न्यायालयाकडे केली. बचाव पक्षाच्या वकिलांनी त्यावर युक्तिवाद केला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यावर न्यायालयाने २९ मार्चपर्यंत शिवकुमारला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, पुराव्यासाठी लॅपटॉप, मोबाईल, कागदपत्रे जमा करण्याच्या प्रक्रियेने आता वेग घेतला आहे. दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत काही लोक उपवनसंरक्षक शिवकुमारचे कान भरत होते, असे नमूद केल्याने ते कोण आहेत, याचा शोधसुद्धा घेतला जाईल. अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आज, शनिवारी येथे जमलेल्या नागरिकांनी केली. 

दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणात व्याघ्र प्रकल्पाचे तत्कालीन क्षेत्रसंचालक एम. एस. रेड्डी यांच्याविरुद्ध अद्याप गुन्हा दाखल झाला नसून, चौकशी सुरू आहे. 
-विलास कुलकर्णी, पोलिस निरीक्षक, धारणी.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख