५००० डेरेदार वृक्ष तोडण्याची तयारी होतेय, नागपूरकरांनी आता जागं व्हायला हवं... - preparing to cut doen five thousand deciduous trees nagpurkar should wake up now | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.

५००० डेरेदार वृक्ष तोडण्याची तयारी होतेय, नागपूरकरांनी आता जागं व्हायला हवं...

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 31 मे 2021

अक्षरशः रस्त्यालगतची हजारो झाडे दिवसाढवळ्या तोडली गेली. तेव्हाही पर्यावरणवाद्यांनी विकासाच्या भकास कृतीचा कडाडून विरोध केला होता. पण केंद्र सरकारच्या अनुदानावर रस्ते बांधणीचं कारण पुढे करून चंद्रशेखर यांनी त्यांच्या कृतीचे समर्थन केले होते.

नागपूर : शहरातील अजनी रेल्वे स्टेशनच्या परिसरात इंटर मॉडेल स्टेशन Inter Moden Station तयार करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Uion Minister Nitin Gadkari यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. Is an ambitious project पण ५००० डेरेदार वृक्षांची कत्तल या प्रकल्पासाठी करावी लागणार आहे. प्रकल्पाकडून तशी परवानगी महानगरपालिकेला मागण्यात आली आहे. वृक्षतोड होऊ नये, यासाठी पर्यावरणवादी सरसावले आहेत. नागपूरकरांनी आता जागं व्हायला पाहिजे, असा आवाहन पर्यावरणवाद्यांकडून केले जात आहे. Environmentalists are urging Nagpurites to wake up now

अजनी रेल्वे स्टेशनवर इंटर मॉडेल स्टेशन, मल्टीमोडल हब हा प्रकल्प १५८८ कोटी रुपये खर्चून पूर्ण केला जाणार आहे. रेल्वे, रस्ते, जलमार्ग, हवाईमार्ग यांसह परिवहनाच्या सर्व साधनांना हा प्रकल्प एकत्रित करणार आहे. या इंटर मॉडेल स्टेशनमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेस, मध्यप्रदेश परिवहनाच्या बसेस, खासगी बसेस आणि नागपूर शहर बसचे केंद्र हेच स्टेशन असणार आहे. नागपूर मेट्रोचेही स्टेशन या इंटर मॉडेल स्टेशनला लिंक असणार आहे. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे नागपूरहून छिंदवाडा, बैतुल, गोंदीया, रामटेक, वडसा, अमरावती  ब्रॉडगेज मेट्रोने जोडले जाणार आहे. या कामासाठी परवानगी मिळालेली आहे. पाच वर्षांनंतर अंदाजे १०० मेट्रो येथून धावणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी या प्रकल्पाची कोनशिला रचताना दिली होती. 

या प्रकल्पासाठी अजनी रेल्वे स्टेशन परिसरातील ५००० झाडे तोडावी लागणार आहेत. ही झाडे तोडण्याची परवानगी प्रकल्पाने नागपूर महानगरपालिकेकडे केली आहे. महानगरपालिकेने अद्याप त्यावर निर्णय घेतलेला नाही. सद्यस्थितीत त्यावर आक्षेप मागविण्यात आले आहेत. ही प्रक्रिया दोन ते तीन महिन्यांत पूर्ण होईल, असे पालिकेकडून सांगण्यात येत आहे. पर्यावरणवाद्यांना वर्षानुवर्षांपासून असलेली झाडे तोडण्यास कडाडून विरोध दर्शवला आहे. यासाठी पर्यावरणवाद्यांनी वेळोवेळी आंदोलनाचाही पवित्रा घेतलेला आहे. 

पर्यावरणवाद्यांनुसार, भारत हा एक असा देश आहे, जिथे ना माणसाला किंमत, ना माणसाच्या जिवाला, ना निसर्गाचा मान, ना प्रकृतीशी इमान. इथे रस्त्यावर,  रेल्वे रुळांवर, पाण्यात... अगदी कशीही माणसं मरू शकतात आणि म्हणूनच कोविड-१९ च्या संसर्गाने येणारे मरणही आमच्या बधिर संवेदना जागृत करू शकत नाही. परिणामी आमच्या बेमुर्वत,  बेलगाम वर्तनात काहीच फरक पडत नाही. हेच या नागपूर महानगरपालिकेच्या पाच हजार वृक्षतोडीच्या जाहिरातीवरून स्पष्ट होते. 

ज्या नागपूर शहरात अवघ्या एक महिन्याआधी ऑक्सिजन टंचाईमुळे अनेक रुग्ण मरण पावले होते.  त्याच नागपूर शहराचे व्यवस्थापन करणारी महापालिका तब्बल पाच हजार डेरेदार, घनगर्द वृक्षांच्या मुळावर उठते.  सगळी लाज गुंडाळून आपल्या कुकर्माची  जाहिरात करू शकते. हेच आमच्या समाजाचे खरे वास्तव आहे.  एकेकाळी आपल्या थाटात जगणारी,  ग्रीन सिटी असणारी ही मध्य प्रांताची पूर्व राजधानी,  महाराष्ट्रात आली आणि उपराजधानी झाली, ती कायम उपरी, उपेक्षित राहण्यासाठी. विकासाच्या  प्रत्येक टप्प्यावर या शहरात वृक्षतोड केली गेली. २००२-२००३ मध्ये चंद्रशेखर नामक मनपा आयुक्तांच्या हाताने पहिली वृक्ष कत्तल झाली होती. 

हेही वाचा : नेतृत्व बदलासाठी भाजप आमदारांचा दबाव 

अक्षरशः रस्त्यालगतची हजारो झाडे दिवसाढवळ्या तोडली गेली. तेव्हाही पर्यावरणवाद्यांनी विकासाच्या भकास कृतीचा कडाडून विरोध केला होता. पण केंद्र सरकारच्या अनुदानावर रस्ते बांधणीचं कारण पुढे करून चंद्रशेखर यांनी त्यांच्या कृतीचे समर्थन केले होते. सध्या ज्या हालचाली सुरू आहेत, त्या निर्लज्जपणाचा नवीन अवतार मानायला हरकत नाही. नागपूरकर मंडळींनी आतातरी जागं व्हायला हवं.  फक्त नागपूरच नाही, तर मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, परभणी, अकोला, जळगाव आदी शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागातील लोकांनी आपल्या अवतीभवतीच्या पर्यावरण रक्षणासाठी पुढे आले पाहिजे. जर सरकारी यंत्रणा झाडांच्या, नदी-तलावांच्या नाशासाठी काम करत असतील, तर जनतेने जल, जंगल आणि जमिनीच्या रक्षणासाठी झाडं लावण्याचा, नदी-तलावांच्या स्वच्छतेचा निर्धार केला पाहिजे. ही पोकळ बडबड न राहता एक-एक हात हातात घेऊन एक चळवळ उभारावी, असे आवाहन पर्यावरणवाद्यांकडून करण्यात आले आहे. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख