दुकानांबाहेर मास्कच्या किंमतीचे फलक मराठीत लावा : डॉ. राजेंद्र शिंगणे - post the price tag of the mask in marathi outside the shop said dr rajendra shingane | Politics Marathi News - Sarkarnama

दुकानांबाहेर मास्कच्या किंमतीचे फलक मराठीत लावा : डॉ. राजेंद्र शिंगणे

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

मंत्री डॉ. शिंगणे यांनी नागपूर दौऱ्यावर आले असताना जवळपास १५ मेडिकल दुकानांची तपासणी केली. शासनाने निर्धारित केलेल्या दरांनुसार मास्कची विक्री होत आहे की नाही याची खातरजमा केली. यावेळी दुकानांच्या बाहेर शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे मास्कच्या किमतीचे फलक लावण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या.

नागपूर : शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे मास्कच्या किमतीचे फलक सर्व दुकानदारांनी दर्शनी भागात मराठी भाषेत लावावे आणि ठरवून दिलेल्या दरातच मास्कची विक्री करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले. नियमाची अमलबजावणी न केल्यास कठोर कारवाई करण्याचा ईशाराही त्यांनी दिला. 

कोरोनाचे संक्रमण झाल्यानंतर सुरूवातीला मास्क आणि सॅनिटायजरची जादा दराने विक्री सर्रास केली जात होती. त्याची दखल राज्य सरकारने घेतली आणि साठेबाजी व काळाबाजारी करणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू केली. त्यानंतर मास्क आणि सॅनिटायजरचा मुबलक पुरवठा कसा होईल, यासाठीदेखील प्रयत्न केले. त्यानंतर काही प्रमाणात साठेबाजांवर नियंत्रण आले. हल्ली मास्कचा पूर्वीयेवढा तुटवडा नाही. पण तरीही काही दुकानदार नागरिकांना जादा दराने मास्कची विक्री करीत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला मिळाल्या. त्याची दखल सरकारने घेतली. 

मंत्री डॉ. शिंगणे यांनी नागपूर दौऱ्यावर आले असताना जवळपास १५ मेडिकल दुकानांची तपासणी केली. शासनाने निर्धारित केलेल्या दरांनुसार मास्कची विक्री होत आहे की नाही याची खातरजमा केली. यावेळी दुकानांच्या बाहेर शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे मास्कच्या किमतीचे फलक लावण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. ज्या दुकानांसमोर इंग्रजीमध्ये किंतीचे फलक लावले होते, त्या दुकानदारांना मराठी भाषेत फलक लावण्याच्ये निर्देशही त्‍यांनी दिले. जे कुणी दुकानदार या नियमांचे पालन करणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा ईशारा त्यांनी दिला. 

डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केलेल्या या कार्यवाहीचे नागरिकांनी स्वागत केले. सरकारने घेतलेला हा निर्णय सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारा आहे. त्यामुळे या नियमाची अमलबजावणी करताना ती काटेकोर कशी होईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. व्यापाऱ्यांनीसुद्धा सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करुन नियमांचे काटेकोर पालन करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.            (Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख