आधी धमकी देणाऱ्या पोलिसांनी संदीप जोशींच्या आंदोलनाचा घेतला धसका ! - police threatens sandeep joshis agitation | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

आधी धमकी देणाऱ्या पोलिसांनी संदीप जोशींच्या आंदोलनाचा घेतला धसका !

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 3 जून 2021

राणी दुर्गावती चौकातील क्रिस्टल नर्सिंग होममध्ये प्रणीत कडेकर या तरुणाचे वडील उपाचारार्थ दाखल होते. हॉस्पिटलकडून वारंवार पैशाची मागणी केली जात होती. पैसे न दिल्यास त्यांची औषधे बंद करू, अशा धमक्या दिल्या जात असल्याची तक्रार त्याने संदीप जोशी यांच्याकडे केली होती.

नागपूर : राणी दुर्गावती चौकातील क्रिस्टल केअर हॉस्पिटलमध्ये Crystal Care Hospital रुग्णांच्या नातेवाइकांनी पैसै न दिल्यामुळे रुग्ण दगावला. हॉस्पिटलच्या विरोधात माजी महापौर संदीप जोशींनी पाचपावली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. Former mayor Sandeep Joshi had lodged a complaint at Pachpavli police station तरीही पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. उलट जोशींनाच Sandeep Joshi धमकावले. पण त्यांनी आंदोलन केल्यानंतर पोलिस नरमले आणि क्रिस्टल केअर हॉस्पिटलची चौकशी करण्याचे आश्‍वासन दिले.  

पाचपावली पोलिसांनी सखोल चौकशीसाठी तीन आठवड्याचा वेळ मागितला आहे. विशेष म्हणजे तत्पूर्वी पोलिसांनी जोशी यांनाच आंदोलन केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला होता. काल जोशी यांनी आंदोलन सुरू करताच २१ मिनिटाच्या आत पोलिसांनी त्यांना चर्चेला बोलावले. ‘आम्ही या प्रकरणाची आणखी चौकशी करीत आहोत, याकरिता तीन आठवडे लागतील. यासंदर्भात मेडिकल प्रशासन आणि महापालिकेला अभिप्राय मागितला आहे. तो आल्यानंतर कारवाई केली जाईल’, असे आश्वासन पोलिसांनी दिले. 

कोरोनाच्या रुग्णाने तक्रार केली म्हणून क्रिस्टल केअर हॉस्पिटलने त्याचे व्हेंटिलेटर काढून घेतले होते. त्यामुळे दिलीप कडेकर याचा मृत्यू झाला. या अमानुष वागणुकीच्या विरोधात संदीप जोशी यांनी कारवाईसाठी पाचपावली पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. तब्बल २० दिवसांपासून पोलिस कारवाई करण्यास टाळाटाळ करीत होते. मृतकाच्या मुलाने संदीप जोशी यांना क्रिस्टलमध्ये घडलेला सर्व प्रकार सांगितला होता. कोरोनाच्या त्या लाटेत अनेक रुग्णालयांमध्ये असे प्रकार सुरू होते. त्यामुळे जोशींनी तत्काळ या प्रकरणाची दखल घेतली आणि हॉस्पिटलच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतरही पोलिस जुमानत नसल्यामुळे त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. 

असे आहे प्रकरण 
राणी दुर्गावती चौकातील क्रिस्टल नर्सिंग होममध्ये प्रणीत कडेकर या तरुणाचे वडील उपाचारार्थ दाखल होते. हॉस्पिटलकडून वारंवार पैशाची मागणी केली जात होती. पैसे न दिल्यास त्यांची औषधे बंद करू, अशा धमक्या दिल्या जात असल्याची तक्रार त्याने संदीप जोशी यांच्याकडे केली होती. ते स्वतः इस्पितळात गेले होते. त्यामुळे चिडलेल्या हॉस्पिटलने दिलीप कडेकर या रुग्णाचे व्हेंटिलेटर काढून टाकले. त्यामुळे त्याचा जीव गेला. जोशी यांनी कडेकर यांच्या कुटुंबीयासह पाचपावली पोलिसांकडे सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी तक्रार केली होती.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख