गंगाजमुना प्रकरणी पोलिसांची कारवाई योग्यच, पण महिलांचे पुनर्वसन करावे लागेल...

रेड लाइट म्हणून प्रसिद्ध या वस्तीत दोन हजार महिला व तरुण मुली वेश्याव्यवसाय करतात. परंतु १० ऑगस्ट रोजी पोलिसांनी या वस्तीत छापा घातल्यानंतर अल्पवयीन मुलींकडून बळजबरीने देहव्यापार करून घेतले जात असल्याचे निदर्शनात आले.
Yashomati Thakur
Yashomati Thakur

नागपूर : गेल्या २०० वर्षांपासून From last 200 years नागपूर शहराच्या मध्यभागात गंगाजमुना Gangajamuna ही वारांगनांची वस्ती आहे. पोलिसांनी कारवाई करून ही वस्ती सील केली. त्यानंतर गंगाजमुनाचे समर्थक आणि विरोधक यांच्यात संघर्ष पेटला. यावर गंगाजमुना प्रकरणी पोलिसांनी केलेली कारवाई योग्यच आहे, पण वस्तीमध्ये राहणाऱ्या महिलांचे पुनर्वसन झाले पाहिजे, असे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर Minister Yashomati Thakur म्हणाल्या. 

मंत्री ठाकूर म्हणाल्या, यासंदर्भात मी पोलिसांशी बोलले, मुंबईलासुद्धा आमची बैठक झाली. पोलिसांनी जी कारवाई केली, ती चुकीची नाही. अल्पवयीन मुलींना जबरदस्ती जर वाईट कामांमध्ये टाकले जात असेल, तर त्याचा निषेध केला पाहिजे आणि पोलिसांचे कौतुक केले पाहिजे. आपण एखादी ॲक्शन घेतली आणि अशा सर्व गोष्टी थांबल्या, असे समाजात होत नाही. महिलांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. यासाठी गृह विभाग आणि महिला व बालकल्याण विभागाने संयुक्तपणे पावले उचलून त्या वस्तीतील महिलांना दिलासा देणे गरजेचे आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या आभा पांडे यांचे गंगाजमुना वसाहत येथून हटविण्याला समर्थन आहे तर राष्ट्रवादीच्याच पदाधिकारी व गंगाजमुना बचाव समितीच्या ज्वाला धोटे यांचा मात्र या वारांगना महिलांचे पुनर्वसन केल्याशिवाय परिसर सील करण्याला विरोध आहे. गंगाजमुना वस्ती बंद करून पोलिसांनी वारांगनांवर दडपशाहीचे धोरण अवलंबविले आहे. त्यांच्यातील सहनशक्ती आता संपत चालली आहे. स्वतःच्या दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत त्यांना आहे, पोलिसांनी जर बंदिस्त वस्ती उघडली नाही, तर मोठा अनर्थ होऊ शकतो. त्याची जबाबदारी पोलिसांनी घ्यावी, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व विदर्भ अन्याय निवारण समितीच्या अध्यक्षा ज्वाला धोटे यांनी दिला होता. वारांगनांमुळे परिसरात राहणाऱ्या सज्जन नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागतो. स्थानिकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गंगा जमुनावस्ती सील करून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावला. एक प्रकारे येथील वारांगनांना बंदिस्त केले. पोलिस आयुक्तांची ही दडपशाही योग्य नाही, असेही धोटे म्हणाल्या. 

शहरातील गंगाजमुना वस्तीत गेल्या १० ऑगस्टपासून सुरू असलेल्या संघर्षाने मागील रविवारी उग्र रूप धारण केले. गंगाजमुना वस्तीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व विदर्भ अन्याय निवारण समितीच्या अध्यक्षा ज्वाला धोटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका आभा पांडे समोरा-समोर आल्या होत्या. दोन्ही गटांच्या समर्थकांकडून वसाहत ठेवणे व हटविण्याबाबत जोरदार घोषणाबाजी सुरू झाल्याने तणाव निर्माण झाला होता. दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांची पोलिसांसोबतही बाचाबाची झाली. विशेष म्हणजे वस्तीचे समर्थन आणि विरोध करणारे कार्यकर्ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचेच होते.  

रेड लाइट म्हणून प्रसिद्ध या वस्तीत दोन हजार महिला व तरुण मुली वेश्याव्यवसाय करतात. परंतु १० ऑगस्ट रोजी पोलिसांनी या वस्तीत छापा घातल्यानंतर अल्पवयीन मुलींकडून बळजबरीने देहव्यापार करून घेतले जात असल्याचे निदर्शनात आले. हा गंभीर प्रकार बघत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गंगाजमुना वस्तीत अल्पवयीन मुलींकडून बळजबरीने देहव्यापार करून घेतले जात असल्याचा ठपका ठेवत वस्ती सील केली होती. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com