विधवेवर बलात्कार केल्याने निलंबित झालेल्या पीआय भोळेने ‘लुटेरी दुल्हन’लाही फसवले होते... - pi bhole who was suspended for rapeng a wodow had also cheated priti | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

विधवेवर बलात्कार केल्याने निलंबित झालेल्या पीआय भोळेने ‘लुटेरी दुल्हन’लाही फसवले होते...

अनिल कांबळे
सोमवार, 15 मार्च 2021

पीआय अरविंद भोळे याने पुण्यातील एक महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिचे अश्‍लील फोटो आणि व्हिडिओ काढले. तिचे लग्न झाल्यानंतर तिला भोळे ब्लॅकमेल करायला लागला. ‘तू देहविक्री करतेस. तुझे फोटो माझ्याकडे आहेत. फोटो तुझ्या पतीला दाखवीन, असे बोलून ब्लॅकमेल करू लागला.

नागपूर : ‘लुटेरी दुल्हन’ ऊर्फ प्रीती हिने शहरातील बड्या लोकांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवले होते. प्रीतीला अटक झाल्यानंतर ते प्रकरण खूप गाजले होते. आता नुकताच विधवेवर बलात्कार केल्याने निलंबित झालेला शहर पोलिस दलातील वादग्रस्त पोलिस निरीक्षक अरविंद भोळे याने प्रीतीला प्रेमाच्या जाळ्यात फसवले होते. प्रीतीमुळे भोळे वादात सापडला होता. ‘प्रीती’ला पोलिस ठाण्यात पत्नीप्रमाणे वागविणे त्याला महागात पडले होते. तिच्या मैत्रिणीने भोळेच्या कानशिलात वाजविल्याची चर्चा तेव्हा शहर पोलिस दलात होती. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद भोळे हा नागपूर शहर पोलिस दलात तीन वर्षांपूर्वी रुजू झाला होता. महिलांशी जवळीक साधण्याच्या सवयीमुळे त्याला ठाणेदारी मिळू शकली नव्हती. तो नंदनवन पोलिस ठाण्यात द्वितीय पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना एका महिला कर्मचाऱ्याला त्रस्त करीत होता. तिने तथाकथित सामाजिक कार्यकर्ता आणि ‘लुटेरी दुल्हन’ नावाने फेमस असलेल्या प्रीती नावाच्या महिलेला भोळेचे कारनामे सांगितले. त्यामुळे त्या महिला पोलिसाची मध्यस्थी करतानाच प्रीतीच त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात फसली. प्रीतीला लग्नाचे आमिष दाखविल्याने ती त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. 

नंदनवन पोलिस ठाण्यात प्रीती आणि तिची मैत्रीण भोळेला भेटायला गेल्या होत्या. दरम्यान भोळेने प्रीतीवर हात उगारला होता. त्यामुळे चिडलेल्या प्रीतीच्या मैत्रिणीने त्याच्या कानशिलात लगावली होती, अशी चर्चा होती. या प्रकारामुळे नंदनवन पोलिस ठाण्यात मोठा राडा झाला होता. या प्रकरणानंतरच भोळेची पोलिस नियंत्रण कक्षात बदली झाली होती. तसेच आसावरी नावाची महिला नंदनवन ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली असता भोळेने तिला जाळ्यात अडकविले होते. या महिलेला काही दिवस नंदनवनमधील फ्लॅटवर पत्नीप्रमाणे ठेवून तिलाही सोडले होते, अशी माहिती आहे. 
 
पोलिस उपनिरीक्षकाने दिला फ्लॅट 
अरविंद भोळेने गिट्टीखदानमध्ये राहणाऱ्या विधवेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला पोलिस उपनिरीक्षक काळूसे यांच्या फ्रेंड्स कॉलनीतील फ्लॅटवर नेले. त्याच फ्लॅटमध्ये विधवेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. तिचे अश्‍लील फोटो आणि व्हिडिओ तयार केले. गेल्या काही महिन्यांपासून काळूसे यांच्या फ्लॅटमध्येच तिला ठेवले होते. 
 
पुण्यातील महिलेला केले ‘ब्लॅकमेल' 
पीआय अरविंद भोळे याने पुण्यातील एक महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिचे अश्‍लील फोटो आणि व्हिडिओ काढले. तिचे लग्न झाल्यानंतर तिला भोळे ब्लॅकमेल करायला लागला. ‘तू देहविक्री करतेस. तुझे फोटो माझ्याकडे आहेत. फोटो तुझ्या पतीला दाखवीन, असे बोलून ब्लॅकमेल करू लागला. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात ती महिला नागपूरला आली. २५ नोव्हेंबर २०२० ला पोलिस उपायुक्त डॉ. संदीप पखाले यांच्याकडे तक्रार केली. त्यावेळी भोळेने तिची माफी मागून तिला परत पाठवले होते.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख