‘लोक इतके संतापले की, रामाचे नाव घेणाऱ्या पक्षाच्या नेत्यालाच रावण ठरवले..’

या लोकांनी देशच विकायला काढला आहे. तिकडे चीनने घुसखोरी केली आहे. पंतप्रधान एक आणि संरक्षणमंत्री दुसरेच बोलत आहे. ज्यांच्यासाठी ‘हाऊ डी मोदी’ केला, तेच ट्रम्प भारतातील हवा प्रदूषित आहे म्हणून उद्धार करीत आहेत. एवढी आपल्या देशाच्या नेतृत्वाची आंतराष्ट्रीय स्तरावर पत घसरली.
Balu Dhanorkar.
Balu Dhanorkar.

नागपूर : गेल्या सत्तर वर्षांत या देशात पंतप्रधानाचा पुतळा कुणी रावण म्हणून जाळला नाही. पण रामाचे नाव घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यालाच रावण ठरविण्याइतत लोक संतप्त झाले आहे. लोकांनी रावण म्हणून विद्यमान पंतप्रधानांचा पुतळा जाळला. त्याला कारणही तसेच आहे. मनात येईल तेव्हा नोटबंदी आणि टाळेबंदी. अशा राज्यकारभारामुळे जनता संतापली असल्याचे खासदार बाळू धानोरकर म्हणाले.  

शनिवारी यवतमाळ येथे झालेल्या कॉंग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात खासदार धानोरकर म्हणाले की, न्यायालय, माध्यम सारी बटीक झाली आहे. त्यामुळेच हाथरसच्या घटनेवर पाकीस्तान दंगा भडकविण्यासाठी पैसे पाठवत असल्याचा निर्लज आरोप उत्तर प्रदेशचे योगी करू शकतात. हा योगीच मुळात परदेशी आहे, तो नेपाळी आहे. तुम्ही आम्ही निवडणुका जिंकू. परंतु या देशातील शेतकरी, शेतमजुर आदिवासी दलित, ओबीसींच्या हक्कांचे काय? त्यासाठी दिल्लीत आपल्या विचारांची माणस सत्तेत हवी. स्वत:च्या मित्रांचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी नोटबंदी केली. यात कुणाचे भले झाले, अदानी, अंबानी. तुम्हाला आम्हाला काय सांगितले. आंतकवाद, नक्षलवाद खतम होईल. पुलवामाचा हल्ला नोटबंदीनंतरचा. काळापैसा परत येईल, असेही गाजर दाखविले. चलनातील ९९.८ टक्के नोटा परत आल्या. पण नोटबंदीच्या हल्यात कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. लाखो छोटे-मोठे उद्योग बंद पडले. आता पंतप्रधान आणि भाजपवाले नोटबंदीचा उल्लेख करायलाही घाबरतात. कोरोनाचाही यांनी इव्हेंट बनविला. आधी टाळ्या वाजवा.. मग काय तर दिवे लावा.. २१ दिवसांत कोरोना जाईल, असा बुवाबाजीचा उपाय सांगितला. 

आमचे नेते राहूल गांधी जानेवारी महिन्यांपासून कोरोनाच्या संकटाची जाणीव करून देत होते. अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल, असा इशारा देत होते. पण नाही ऐकले. त्यांना मध्यप्रदेशातील सरकार पाडायच होते. ते पाडले आणि २३ मार्चला कोणतेही नियोजन नसताना टाळेबंदी लावली. कोट्यवधी जनतेची फरफट झाली. आता देशाची जीडीपी उणे २३ पर्यंत पोहोचली आहे. बांगलादेशाच्या खाली आपण गेलो आहे. मधातच २० लाख कोटी रूपयांच्या कोरोना लॉकडाऊन संकट निवारण पॅकेज आणले. अच्छे दिनापासून सुरू झालेला आकड्यांचा फसवाफसवीचा हा खेळ आहे. ते पॅकेज कुणाला मिळाले. अंदानी आणि अंबानीला. कोरोनाच्या संकटात या देशात एकच माणूस श्रीमंत झाला. तो म्हणजे अंबानी. राहूल गांधींनी काय सांगितले. थेट गरीबांच्या खात्यात रक्कम जमा करा. 

केंद्र सरकारच्या ‘घुमाफिरा के’ पॅकेजऐवजी जर कामगार, विक्रेता आणि ग्राहक यांच्या खात्यत थेट रक्कम जमा केली असती तर अर्थव्यवस्था वाचली असती. परंतु त्यांना केवळ दोन तीन उद्योपतींना वाचवायचे होते. आता कोरोना लसीचे राजकारण सुरू केले आहे. आपल्या सोयीचे संकुचित राजकारण पुढे रेटण्यासाठी लोकांना होणाऱ्या जीवघेण्या आजाराचे भांडवल केले जात आहे. बिहार निवडणुकीत कोरोना लस फुकट देणार, इथपर्यंत नीच पातळी त्यांनी गाठली आहे. उर्वरीत राज्यांना आता निवडणुका आल्याशिवाय लस मिळणार नाही. तुम्ही मेले तरी चालेल. जीएसटीसारखी आधी स्वत:च नाकारलेली करप्रणाली राबविली. आता त्याचेही राज्यांना पैसे देत नाही. दारूड्या माणसांसारखे केंद्रातील सरकार आहे. स्वत:च्या घरातील भांडी, पत्नीचे दागिने विकून सरकार चालवित असल्याचा आरोप धानोरकर यांनी केला. 

या लोकांनी देशच विकायला काढला आहे. तिकडे चीनने घुसखोरी केली आहे. पंतप्रधान एक आणि संरक्षणमंत्री दुसरेच बोलत आहे. ज्यांच्यासाठी ‘हाऊ डी मोदी’ केला, तेच ट्रम्प भारतातील हवा प्रदूषित आहे म्हणून उद्धार करीत आहेत. एवढी आपल्या देशाच्या नेतृत्वाची आंतराष्ट्रीय स्तरावर पत घसरली. आता कृषी संशोधन बिलाच्या नावावर शेतकऱ्यांना गिफ्ट दिल्याचे मोदी सरकार सांगत आहे. शेतकऱ्यांना हे गिफ्ट नको. मोदींचा टाळेबंदी, नोटबंदी, जीएसटीने देशातील लोकांचे वाटोळेच केले. आता या नव्या कायद्यानेही शेतकऱ्यांचे वाटाळे होईल. शेतकऱ्याना कुठेही माल विकण्याची मुभा मिळणार, असे सांगितले जात आहे. ती आधीही होती. फक्त अडते आणि ट्रेडर्सवर बंधने होती. कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्याच्या डोक्यावरचे छत आहे. त्यातून पाणी गळत असेल, ती तुटलेली असेल. त्यात दुरस्ती करता येईल. पण ते छतही डोक्यावरून काढून टाकले तर शेतकरी जाईल कुठे, असा प्रश्‍न खासदार धानोरकर यांनी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com