पोलिसच खरे मित्र असल्याचे आता गडचिरोलीतील लोकांना पटले आहे...

गडचिरोली पोलिसांच्या शौर्यामुळे मागील काही वर्षांत महाराष्ट्रातून नक्षल चळवळीचे पाय उखडताना दिसत आहेत. पण, राज्याची व या जिल्ह्याची सीमा लागून असलेल्या छत्तीसगड राज्यात नक्षलवादी पुन्हा पुन्हा फणा वर काढताना दिसतात.
Sarkarnama Banner
Sarkarnama Banner

गडचिरोली : जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्‍यातील एटापल्ली उपविभागाअंतर्गत येणाऱ्या कोटमी पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील पैडी जंगल परिसरात पोलिसांचे सी-६० दल व नक्षलवाद्यांमध्ये C-60 police force and Naxals in Paddy forest areaआज झालेल्या चकमकीत पोलिस जवानांनी तब्बल १३ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. Police killed 13 Naxalites गडचिरोली Gadchiroli पोलिसांनी दाखविलेले शौर्य अतिशय कौतुकास्पद आहे. पोलिस विभाग नक्षलवाद्यांशी शस्त्राने झुंजतानाच जिथे इतर प्रशासकीय विभाग पोहोचू शकत नाही. तिथे जाऊन पोलिस गोरगरीब आदिवासींना मदतीचा हात देतात. त्यामुळे आता पोलिसच आपले खरे मित्र असल्याचे नक्षलग्रस्त भागातील नागरिकांना उमगत आहे, the people of gadchiroli are now convinced that the police are their true friends असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील Home Minister Dilip Walse Patil आज येथे म्हणाले.  

गृहमंत्री पाटील आपल्या नियोजित दौऱ्यानुसार आज गडचिरोलीत आले होते. जिल्हा पोलिस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गडचिरोली पोलिस दलाच्या शौर्यपूर्ण कामगिरीचे त्यांनी भरभरून कौतुक केले. पत्र परिषदेला पोलिस महासंचालक (विशेष अभियान) संजय सक्‍सेना, गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उप महानिरीक्षक संदीप पाटील, पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) मनीष कलवानिया, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक सोमय मुंडे आदींची उपस्थिती होती. सध्या तेंदू हंगाम सुरू आहे. या हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर नक्षलवादी खंडणी वसूल करण्यासाठी एकत्र येतात. 

या पार्श्‍वभूमीवर पैडी जंगल परिसरात सी-६० चे जवान नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना शुक्रवारी सकाळी ६ ते ७.३० वाजताच्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या ६० ते ७० नक्षलवाद्यांनी सी-६० जवानांवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. ही चकमक जवळपास दीड तास चालली. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी पळून गेले. त्यानंतर पोलिसांनी या परिसरात शोध अभियान राबविले असता घटनास्थळी ६ पुरुष नक्षली व ७ महिला नक्षली, अशा एकूण १३ नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले. तसेच एके ४७, एसएलएआर,कार्बाईन, ३०३, १२ बोअर रायफल आदी शस्त्रे व भरपूर स्फोटके तसेच नक्षलवाद्यांच्या दैनंदिन जीवनात वापरण्यात येणारे साहित्य आढळून आले. 

मृत नक्षल्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून आणखी काही नक्षलवादी जखमी असण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांना नक्षल्यांविरोधात यश मिळत असून देशाच्या लोकशाहीला धोकादायक अशी ही हिंसक चळवळ उखडून काढण्याचे कार्य पोलिस तत्परतेने करत आहेत. आपल्या या दौऱ्यात आपण पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणल्या असून पोलिस विभाग अधिक सक्षम करण्यासह विकासकामांना गती देण्यात येईल, असेही ते म्हणाले.

छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना पाठवणार पत्र...
गडचिरोली पोलिसांच्या शौर्यामुळे मागील काही वर्षांत महाराष्ट्रातून नक्षल चळवळीचे पाय उखडताना दिसत आहेत. पण, राज्याची व या जिल्ह्याची सीमा लागून असलेल्या छत्तीसगड राज्यात नक्षलवादी पुन्हा पुन्हा फणा वर काढताना दिसतात. म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्यास सांगून या पत्राद्वारे महाराष्ट्रात नक्षल चळवळीचा कसा बंदोबस्त करण्यात येत आहे, याची माहिती देणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com