इंधन दरवाढीच्या विरोधात काॅंग्रेस आक्रमक, पटोले, वडेट्टीवार धडकले पेट्रोल पंपवर..

आज पेट्रोलचे दर हे २७ पैशांनी तर डिझेलचे दर हे २८ पैशांनी वाढले आहेत. पेट्रोल डिझेलच्या दरात रोज सकाळी ६ वाजता बदल होत असतो. सकाळी ६ वाजताच नवे दर लागू होत असतात. परकीय चलन दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती काय आहेत.
Sarkarnaa Banner
Sarkarnaa Banner

नागपूर : पेट्रोल आणि डिझेलच्या Petrol and diesel सातत्याने, वेगाने होणाऱ्या दरवाढीमुळे प्रत्येक जण वैतागला आहे. पाच राज्यांमधील निवडणुका होईपर्यंतच इंधनाचे दर स्थिर होते. Fuel prices remained stable until elections were held in five states त्यानंतर दर झपाट्याने वाढतील, असा अंदाज लावला जात होता आणि तो तंतोतंत खरा ठरला. या दरवाढीच्या विरोधात आज कॉंग्रेस रस्त्यावर उतरली. Congress took to the streets today to protest against the hike प्रदेशाध्यक्ष, आमदार नाना पटोले MLA Nana Patole यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथे पेट्रोल पंपवर आंदोलन करण्यात आले. 

या आंदोलनात मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार अभिजित वंजारी, प्रदेश कॉंग्रेस सचिव गिरीश पांडव, गडचिरोली जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष तथा माजी आमदार नामदेवराव उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम, तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष परसराम टिकले, युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी नगराध्यक्ष हिरा मोटवानी, जेसा मोटवानी, नगरसेवक गणेश फाफट, हरीश मोटवानी, आकाश अग्रवाल, राजू रासेकर, डॉ. प्रमोद साळवे, शेहजाद शेख, जमाल शेख, पिंकू बावने, मिलिंद सपाटे, माजी पंचायत समिती उपसभापती नितीन राऊत, राजेंद्र बुल्ले यांच्यासह शेकडो कॉंग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते. आंदोलनानंतर विश्रामगृहावर नागरिकांनी मागण्यांची निवेदने दिली.

नाना पटोले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने युवक कॉंग्रेसच्यावतीने सेवा सप्ताह पाळण्यात येत आहे. त्यानिमित्ताने गडचिरोली येथे जात असताना नाना पटोले, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात देसाईगंज येथील जय माता की पेट्रोल पंपवर पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात केंद्र सरकारचा निषेध करून मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सातत्याने होणाऱ्या दरवाढीवर केंद्र सरकारने तोडगा काढावा, अन्यथा यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आजच्या आंदोलनातून देण्यात आला. इंधन दरवाढीचा फटका जसा सामान्य नागरिकांना बसतो आहे, तसाच तो शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बसत आहे. त्यामुळे दरवाढ कमी केल्याशिवाय कॉंग्रेस स्वस्थ बसणार नाही, असे नाना पटोले यावेळी म्हणाले. 

आज पेट्रोलचे दर हे २७  पैशांनी तर डिझेलचे दर हे २८ पैशांनी वाढले आहेत. पेट्रोल डिझेलच्या दरात रोज सकाळी ६ वाजता बदल होत असतो. सकाळी ६ वाजताच नवे दर लागू होत असतात. परकीय चलन दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती काय आहेत, त्यानुसार रोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होतो. रोज वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे सर्वसामान्यांचे मात्र कंबरडे मोडले आहे. सध्या शेतीची कामे चालू आहेत. मजुरी परवडणारी नसल्याने शेतकरी सर्व कामे यांत्रिकी पद्धतीने करतात. जेव्हा वीज नसते तेव्हा उन्हाळी पिकांना डिझेलच्या पंपाने शेतीत ओलीत केले जाते. अशातच डिझेलचे भाव सातत्याने वाढत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कोरोना काळात अनेकांचे रोजगार हिरावले गेले. अशा स्थितीत केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेलची ज्या वेगाने दरवाढ केली आहे, ही क्रूर थट्टाच आहे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com