पटोले, केदार पावसात भिजले...पण नितीन राऊत यांनी ढूंकूनही नाही पाहिले... - patole kedar got wet in the rain but nitin raut did not even see the cover | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

पटोले, केदार पावसात भिजले...पण नितीन राऊत यांनी ढूंकूनही नाही पाहिले...

अतुल मेहेरे
गुरुवार, 8 जुलै 2021

सुनील केदार यांचीही इच्छा पालकमंत्री होण्याची होती अन् आताही आहे. नागपूर जिल्ह्यात त्यांच्या कामाचा झपाटा आणि आतापर्यंत घेतलेल्या बैठकांची संख्या पाहता सूत्रांनी दिलेल्या माहितीला बळ मिळते.

नागपूर : केंद्रातील भाजप सरकारने कृत्रिम महागाई निर्माण केल्याचा आरोप करीत कॉंग्रेसने मोदी सरकारच्या Modi Government विरोधात दंड थोपटले आहेत. आज कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले State president of congress Nana Patole यांच्या नेतृत्वात नागपुरात मुसळधार पावसात सायकल मोर्चा काढण्यात आला. पण या मोर्चात नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत Guardian Minister of Nagpur District कुठे दिसले नाहीत, हा विषय दिवसभर चर्चेत राहिला. शेवटी नानांच्या सायकलवर पालकमंत्री का नाही बसले, Whay did not guardian minister sit on nana's bicycle या प्रश्‍नाचे उत्तर अजूनही राजकीय वर्तुळात शोधले जात आहे. 

स्लिपर घालून आले नाना.. 
डॉ. नितीन राऊत आज नागपुरात होते. पण सायकल मोर्चाकडे ते फिरकलेही नाहीत. आज सकाळपासून नागपुरात मुसळधार पाऊस होता. पण भर पावसातही स्वतः नाना पटोले, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, नागपूर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, नागपूर जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री अनिस अहमद, आमदार अभिजित वंजारी, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मुसळधार पावसामुळे नाना पटोले तर स्लिपर घालून मोर्चासाठी आले होते. निवेदन देतानाही हे सर्व चिंब भिजलेले होते. पण पालकमंत्री डॉ. राऊत यांच्या मोर्चात न येण्यामागे केवळ पाऊस हे कारण नसावे, अशी चर्चा जोर धरत आहे. 

ऊर्जा खाते आणि पालकमंत्रीपद ?
नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे ऊर्जा खाते सोपविण्यात येणार आहे आणि डॉ. राऊत यांना विधानसभेच्या अध्यक्षपदी विराजमान केले जाणार आहे, या चर्चांनी जोर धरला होता. नाना स्वतः याबाबतीत काही बोलले नसले तरी ऊर्जा मंत्री होण्याची त्यांची सुप्त इच्छा आहे, असे जाणकारांकडून सांगण्यात येत होते. सूत्र तर हेसुद्धा सांगतात, की सुनील केदार यांचीही इच्छा पालकमंत्री होण्याची होती अन् आताही आहे. नागपूर जिल्ह्यात त्यांच्या कामाचा झपाटा आणि आतापर्यंत घेतलेल्या बैठकांची संख्या पाहता सूत्रांनी दिलेल्या माहितीला बळ मिळते. त्यामुळे आपल्या दोन्ही पदांवर या दोन नेत्यांची नजर तर नाही ना? असे वाटूनही कदाचित पालकमंत्री डॉ. राऊत यांनी आजच्या सायकल मोर्चाकडे पाठ फिरवली असावी, असाही जाणकारांचा कयास आहे. 

हेही वाचा : सुनील केदार, नाना पटोले भर पावसात निघाले सायकलवर...

एकत्रीकरण होणार की नाही ?
आमदार नाना पटोले यांनी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर (कोरोनाचे संक्रमण कमी झाल्यावर) संघटन वाढवण्यासाठी राज्यभर दौऱ्यांचा सपाटा लावला. या दौऱ्यात त्यांनी कॉंग्रेसवर नाराज होऊन इतर पक्षांत गेलेल्या लोकांना स्वगृही आणण्यासाठी कौशल्य पणाला लावले. माजी अर्थराज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांची घरवापसी नानांच्या प्रयत्नांमुळे झाल्याचे सांगण्यात येते. पक्ष सोडून गेलेल्यांना परत आणत असताना पक्षात असलेल्या लोकांना जपणेही प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची जबाबदारी आहे, असे जाणकारांचे मत आहे. यावर प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना यापुढे काय काळजी घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख