खासगी रुग्णालयांनी उकळलेला पैसा रुग्णांना मिळाला परत !

सेव्हन स्टार हॉस्पिटलने पालिकेकडे दिलेल्या रेकॉर्डनुसार, विविध आजारांच्या रुग्णांकडून दीड लाखांपर्यंतची रक्कम अधिक उकळल्याचे पुढे आले. जयंत मेश्राम या रुग्णाकडून हॉस्पिटलने २ लाख २१ हजार ३९० रुपये घेतले. मुळात राज्य शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार त्यांच्याकडून ६९ हजार ४१९ रुपये घेणे अपेक्षित होते. त्यांना १ लाख ५१ हजार ९७१ रुपये परत करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
Tukaram Mundhe
Tukaram Mundhe

नागपूर : खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट केली जात असल्याची ओरड नेहमीच होते. शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार कधीच उपचाराची आकारणी केली जात नाही. कोरोनाच्या स्थितीतही खासगी रुग्णालयांनी रुग्णांना लुटणे थांबवले नाही. त्यामुळे महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी खासगी रुग्णालयांना चांगलाच दणका दिला. त्यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे खासगी रुग्णालयांनी अतिरिक्त उकळलेली रक्कम रुग्णांना परत मिळाली आहे. 

जगनाडे चौकातील सेव्हन स्टार हॉस्पिटलला महापालिकेने पाच लाख रुपये दंड ठोठावला. दंडाची रक्कम तीन दिवसांत पालिकेत जमा करण्याचे निर्देश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले. एवढेच नव्हे रुग्णांकडून उकळण्यात आलेले अवाजवी ६.८६ लाख रुपये परत करण्याचेही निर्देश त्यांनी दिले. राज्य सरकारने कोविडसह विविध आजारांच्या रुग्णांसाठी ठरवून दिलेल्या शुल्काशिवाय जास्त शुल्क आकारणे, कोव्हीड रुग्णांसाठी ८० बेडचे आरक्षण धुडकावून लावल्याप्रकरणी सेव्हन स्टारवर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली. 

राज्य सरकारने खाजगी रुग्णालयांना कोविड रुग्णांसाठी आकारण्यात येणारे शुल्क ठरवून दिले आहे. परंतु सरकारच्या आदेशाला पायदळी तुडवीत जगनाडे चौकातील सेव्हन स्टार हॉस्पिटलने रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क वसूल केल्याचे पालिकेच्या तपासणीत उघडकीस आले. जास्त आकारलेले शुल्क रुग्णांना परत करा, असे आदेश मुंढे यांनी ‘सेव्हन स्टार'ला तीन दिवसांपूर्वी दिले होते. आज आयुक्तांनी सेव्हन स्टारने आकारलेल्या अतिरिक्त शुल्काचा आकडा निश्चित केला.

रुग्णांकडून उकळलेले अवाजवी ६ लाख ८६ हजार ५२७ रुपये परत करण्याचे निर्देश दिले. सेव्हन स्टार रुग्णालयात तपासणी केल्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रे जप्त केली होती. यात ९९१ रुग्णांची कागदपत्रेही जप्त करण्यात आली होती. या ९९१ रुग्णांपैकी केवळ ३०४ रुग्णांकडून वसूल केलेल्या शुल्काची माहिती सेव्हन स्टारने पालिकेला दिली. परंतु ६८७ रुग्णांकडून वसूल केलेल्या शुल्काची माहिती दडविल्याचेही पुढे आले.

याबाबतही आयुक्तांनी रुग्णालयाला स्पष्टीकरण मागितले होते. परंतु सेव्हन स्टार रुग्णालयाने समाधानकारक उत्तर न दिल्याने आयुक्तांनी आज पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला. वोक्हार्ट हॉस्पिटलला रुग्णांकडून उकळलेले अवाजवी साडेनऊ लाख रुपये परत करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार बुधवारी वोक्हार्टने रुग्णांना उकळलेले अवाजवी शुल्क परत केले. 

दीड लाखांपर्यंत अतिरिक्त उकळले 
सेव्हन स्टार हॉस्पिटलने पालिकेकडे दिलेल्या रेकॉर्डनुसार, विविध आजारांच्या रुग्णांकडून दीड लाखांपर्यंतची रक्कम अधिक उकळल्याचे पुढे आले. जयंत मेश्राम या रुग्णाकडून हॉस्पिटलने २ लाख २१ हजार ३९० रुपये घेतले. मुळात राज्य शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार त्यांच्याकडून ६९ हजार ४१९ रुपये घेणे अपेक्षित होते. त्यांना १ लाख ५१ हजार ९७१ रुपये परत करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. याशिवाय आणखी ३७ रुग्णांकडून अवाजवी शुल्क उकळण्यात आले.    (Edited By : Atul Mehere) 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com