परमबीरसिंह प्रकरण : याचिकेला नवीन वळण, कार्तिक भटने केले गंभीर आरोप... - parambirsingh case new twist in petition kartik bhat made serious allegations | Politics Marathi News - Sarkarnama

परमबीरसिंह प्रकरण : याचिकेला नवीन वळण, कार्तिक भटने केले गंभीर आरोप...

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 10 जून 2021

भट यांचा बांधकामाचा व्यवसाय असल्याने कोट्यवधी रुपयांची त्यांची उलाढाल होती. नेमकी हीच बाब हेरून शालिनी शर्मा यांनी गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन २०० कोटी रुपये मागितले असल्याचे भट यांचे म्हणणे आहे.

नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख Former Home Minister Anil Deshmukh यांच्यावर झालेल्या आरोप प्रकरणात राज्याचे माजी पोलिस महासंचालक परमबीर सिंग Parambir Sing यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार होती. पण या दरम्यान प्रकरणाला नवीन वळण आले. चेंबूर पोलिस ठाण्याच्या तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक शालिनी शर्मा Chembur Police Stations Senior Police Inspector Shalini Sharma यांनी परमबीर सिंग यांच्या नावाने धमकावून २०० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, अशी तक्रार कार्तिक भट Kartik Bhat नामक बांधकाम व्यावसायिकाने केली आहे. 

कार्तिक भट यांनी केलेल्या आरोपांनुसार, शालिनी शर्मा यांनी सचिन वाझे यांनाही मागे सोडत खंडणी वसुलीत आघाडी घेतली होती. त्यांना तत्कालीन पोलिस महासंचालकांचे अभय होते. भट यांचा बांधकामाचा व्यवसाय असल्याने कोट्यवधी रुपयांची त्यांची उलाढाल होती. नेमकी हीच बाब हेरून शालिनी शर्मा यांनी गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन २०० कोटी रुपये मागितले असल्याचे भट यांचे म्हणणे आहे. आज मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी तशी अंतरिम याचिका दाखल केली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयात आज होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता या याचिकेवर १४ जूनला सुनावणी करणार असल्याचे न्यायालयाने सांगितले. 

परमबीर सिंग यांना कालच होणार होती अटक
अकोल्यातील पोलीस अधिकारी भीमराव घाडगे यांच्या तक्रारीनुसार मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य सरकारने उच्च न्यायालयात ॲट्रॉसिटीच्या प्रकरणात ९ जूनपर्यंत परमबीर सिंग यांना अटक करणार नसल्याची हमी दिली होती. ती मुदत काल संपली. परमबीर सिंग यांच्याविरोधात अॅट्रोसिटिचा गुन्हा पोलिस निरीक्षक घाडगे यांनी दाखल केला आहे. परमबीर सिंग हे ठाण्याचे पोलिस आयुक्त असताना घाडगे हे तेथे पोलिस निरीक्षक होते. परमबीर सिंग यांचे चुकीचे आदेश न ऐकल्याने आपल्याविरोधात त्यांनी कुभांड रचल्याची तक्रार त्यांनी केली. तसेच परमबीर सिंग यांच्या वर्तणुकीबद्दल, त्यांच्या संपत्तीबद्दल मोठे आरोप त्यांनी केले. 

हेही वाचा : मुख्यमंत्री साहेब, आमच्या किडण्या घ्या; पण आता मशागतीसाठी पैसे द्या...

अकोला येथे झिरो नंबरने त्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला. त्याचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) सुरू केला आहे.  हा गुन्हा रद्द करावा, या मागणीसाठी परमबीर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या सुटिकालीन खंडपीठापुढे याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती एस. जे. काथवाला आणि न्यायमूर्ती एस. पी. तावडे यांनी न्यायालयीन कामकाजाचा विक्रम 21 मे रोजी नोंदविला. खंडपीठाने परमबीर सिंग यांना पुढील सुनावणी होईपर्यंत अटक करू नये, असा आदेश दिला होता. परमबीर सिंग यांच्यावतीने ज्येष्ठ वकिल महेश जेठमलानी यांनी तर राज्य सरकारतर्फे दलायास खंबाटा यांनी बाजू मांडली होती. परमबीर यांची चौकशी करणारे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी माघार का घेतली? कारण परमबीर यांना त्यांनी थेट सांगितले होते की व्यवस्थेविरोधात जाऊ नका, तुमच्याविरोधात एकापाठोपाठ एक खटले भरू. याचे रेकॉर्डिंग बाहेर आले आणि पांडे यांनी माघार घेतली. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख