परमबीर सिंग यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून वाझेंकडे दिले होते महत्वाचे तपास... 

या सर्व प्रकरणांच्या तपासाची माहिती वाझे हे थेट परमबीर सिंग यांनाच देत होते. या तपासांपैकी दिलीप छाबरीया तसेच टिआरपी प्रकरणात परमबीर सिंग यांनी सचिन वाझेला वसुली करण्याचे आदेश दिल्याचेही सांगितले जाते.
Parambir Sing
Parambir Sing

नागपूर : साहाय्यक पोलिस निरीक्षक वाझे यांना परमबीर सिंग Parambir Singh यांनीच पुन्हा सेवेत घेतले होते. येवढेच नव्हे तर खात्याचे सर्व नियम धाब्यावर बसवून त्यांना मुंबईच्या सीआययू युनिटचा प्रमुख बनवले Made head of Mumbai's CIU unit व महत्वाचे तपास वाझेंकडे दिले होते. त्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची खंडणी ते उकळायचे, They used to boil down the ransom of crores of rupees असे आरोप क्रिकेट बुकी सोनू जालानसह Sonu Jalan इतरांनी आतापर्यंत केले आहेत. खोटे गुन्हे दाखल करून खंडणी उकळल्याच्या अनेक तक्रारी आता होऊ लागल्या आहेत. Many complaints are now being made

गुन्हे शाखा, मुंबई अंतर्गत असलेल्या सर्व शाखांचे वरिष्ठ किंवा प्रभारी पोलीस निरीक्षक यांची नेमणूक किंवा बदली ही पोलिस आयुक्त मुंबई यांच्या पूर्व संमतीने करावी, असे आदेशच २५ जून २०२० रोजी तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी काढले होते. क्रिकेट बुकी सोनू जालान याने परमबीर सिंग यांच्यावर १० कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप केला होता. यानंतर प्रसिद्ध कार डिजाईनर दिलीप छाबरीया यांनीही सचिन वाझेच्या माध्यमातून परमबीर सिंग यांनी २५ कोटी रुपयाची मागणी केल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रातून केला आहे. यापूर्वीही परमबीर सिंग यांच्यावर बांधकाम व्यावसायिक केतन तन्ना, मुनीर पठाण, मयूरेश राऊत यांच्यासह पोलिस खात्यातील अधिकारी भिमराव घाडगे व अनुप डांगे यांनीही गंभीर आरोप केले आहे. 

घाडगे यांच्या तक्रारीवरून परमबीर सिंग यांच्यासह इतर अधिकाऱ्यांवर ॲट्रॉसीटी ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. सध्या या संदर्भात न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दुसरीकडे अनुप डांगे यांनी तर परमबीर सिंग यांचे थेट अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. या सर्व आरोपांमुळे परमबीर सिंग हे सचिन वाझे यांना हाताशी धरून कोट्यवधींची वसुली करीत होते, असे बोलले जात आहे. सचिन वाझे यांना खात्यात घेण्यासापासून ते त्यांच्याकडे महत्वाचे तपास देण्यापर्यंत परमबीर सिंग यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. परमबीर सिंग हे मुंबई पोलिस आयुक्त असताना त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने वाझेला पुन्हा पोलिस दलात घेतले होते. शिवाय दोन दिवसांतच त्यांच्याकडे महत्वाच्या सीआययुची जबाबदारी दिली. 

ही जबाबदारी देत असताना परमबीर सिंग यांनी तेथील प्रभारी पोलिस निरीक्षक विनायक घोरपडे व पोलिस निरीक्षक सुधाकर देशमुख यांची गुन्हे प्रकटीकरण शाखेत बदली केली. सीआययु ते प्रमुख हे पद पोलिस निरीक्षक दर्जाचे आहे. परंतु परमबीर सिंग यांच्या आशीर्वादाने ते सहायक पोलिस निरीक्षक असलेल्या सचिन वाझे यांना मिळाले होते. २५ जून २०२० ला गुन्हे शाखा, मुंबई अंतर्गत असलेल्या सर्व पोलिस निरीक्षकांची नेमणूक किंवा बदली ही माझ्या पूर्व संमतीशिवाय करू नये, असे आदेश पोलिस आयुक्त असताना परमबीर सिंग यांनी काढले. यानंतर परमबीर सिंग यांनी सचिन वाझे यांच्याकडे ९ जुलै २०२० ते १२ मार्च २०२१ पर्यंत अनेक महत्वाचे तपास दिले. 

प्रामुख्याने दिलीप छाबरीया यांच्या प्रकरणासह टीआरपी घोटाळा, खंडणी, बोगस कॉल सेंटर, क्रिकेट बेटींग, हुक्का पार्लर, कॉपी राइट यांसह  इतर गुन्ह्यांचासुध्दा समावेश आहे. तसेच या सर्व प्रकरणांच्या तपासाची माहिती वाझे हे थेट परमबीर सिंग यांनाच देत होते. या तपासांपैकी दिलीप छाबरीया तसेच टिआरपी प्रकरणात परमबीर सिंग यांनी सचिन वाझेला वसुली करण्याचे आदेश दिल्याचेही सांगितले जाते. जर इतर प्रकरणाची चौकशी केली तर त्यातून कोट्यवधींची वसुली झाली असल्याचीही शक्यता आता वर्तविण्यात येत आहे.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com