विजय वडेट्टीवारांच्या फोटोची पूजा करून बारमालकाने साजरा केला आनंद... - the owner of the bar celebrated the joy by worshiping the photo of vijay wadettiwar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

विजय वडेट्टीवारांच्या फोटोची पूजा करून बारमालकाने साजरा केला आनंद...

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 10 जुलै 2021

बार उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी वडेट्टीवार यांच्या प्रतिमेची साग्रसंगीत पूजा केली गेली. जिल्हाभरातील बार-रेस्टॉरंटच्या माध्यमातून तळीराम बंदी उठल्याचा आनंद घेत आहेत.

चंद्रपूर : जिल्ह्यातील दारूबंदी उठविल्याचा असीम आनंद जेवढा मद्यपींना झाला, तेवढाच किंबहुना त्याहूनही जास्त दारू दुकानदार आणि बार मालकांना झाला आहे. ५ जुलैपासून जिल्ह्यात दारूबंदी उठवल्याचा आनंद तळीराम आणि विक्रेते दोघेही साजरा करीत आहेत. गणेश गोरडवार Ganesh Goradwar या बारमालकाने तर आनंदाच्या भरात चक्क पालकमंत्री विजय वडेट्टीवार Guardian Minister Vijay Wadettiwar यांच्या फोटोची साग्रसंगीत पूजा केली. सोशल मिडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. This video is going viral on the social media. 

तब्बल ६ वर्षांनंतर चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यात आली आहे. त्यामुळे दुकान मालकांसह या व्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. दारूबंदीनंतर कामधंदे ठप्प झाल्यानंतर मिळेल ते काम करून या लोकांना कुटुंबाचा गाडा ओढला. आता दारूविक्री सुरू झाल्यामुळे जुना व्यवसाय परत मिळाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकतो आहे. जिल्ह्यात दारूबंदी करण्याच्या हालचाली जेव्हा सुरू झाल्या होत्या, तेव्हा दारूबंदी करावी, या मागणीसाठी जो मोर्चा निघाला होता. त्याहीपेक्षा मोठा मोर्चा दारूबंदी करू नये, ही मागणी करणाऱ्यांचा निघाला होता. आता दारूबंदी उठल्यानंतर त्या मोर्चाच्या आठवणी अनेक जण सांगतात आणि दारूबंदी उठवल्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांना चांगले दिवस कसे आले, हेसुद्धा एकमेकांना पटवून दिले जात आहे. 

दारूबंदी उठविणा-या पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या फोटोची पूजा केली गेली असतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झालाय. बार मालक गणेश गोरडवार यांनी बारमध्ये काउंटरच्या बाजूला दर्शनी भागात फोटो लावून केलेल्या आरतीचा हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे. चंद्रपुरात दारूबंदी उठविल्यानंतर मद्यपींच्या आनंदाला उधाण आले आहे. आपला आनंद सेलिब्रेट करण्यासाठी चंद्रपूर शहराच्या वेशीवर असलेल्या ग्रीन पार्क बार रेस्टॉरंटमधे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची ही प्रतिमा लावली गेली आहे. 

ही बातमी वाचा : राहुल गांधी अध्यक्षपद स्वीकारत नसल्याने काँग्रेस लढवणार नवी शक्कल!

पहिल्या ३ दिवसांत रिचवली १ कोटींची दारू
बार उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी वडेट्टीवार यांच्या प्रतिमेची साग्रसंगीत पूजा केली गेली. जिल्हाभरातील बार-रेस्टॉरंटच्या माध्यमातून तळीराम बंदी उठल्याचा आनंद घेत आहेत. पहिल्या 3 दिवसात सुमारे 1 कोटींची दारू तळीरामांनी रिचविल्याची प्राथमिक माहिती आहे. गेली 6 वर्षे अत्यंत तोट्याची गेल्याची भावना बारमालकाने व्यक्त केली. वडेट्टीवार यांनी दारूबंदी उठवून मद्य व्यावसायिक आणि बारमालक-त्यावर आधारित रोजगार यांना चालना दिल्याने हे अनंत उपकार विसरणार नसल्याची प्रतिक्रियाही त्यांनी नोंदविली आहे.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख