इस्लामचे विरोधक आहेत वसीम रीजवी, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी…

इस्लाम धर्माचे सुरुवातीचे तीन खलीफांच्या विरोधात अनेक खोटे व बिनबुडाचे आरोप वसीम यांनी केले आहेत. यामुळे इतर धर्मांमध्येही इस्लामबद्दल चुकीची माहिती गेली. त्यामुळे धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम रिजवी करीत आहेत. युद्ध प्रसंग, आयती व अत्याचाराच्या विरोधात लढण्याची शिकवण देणाऱ्या आयती चुकीच्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न रिजवी यांनी केला आहे.
Juned Khan - Wasim Rijwai
Juned Khan - Wasim Rijwai

नागपूर : उत्तर प्रदेशच्या लखनौ जिल्ह्यात राहणारे शिया वक्फ बोर्डचे अध्यक्ष वसीम रीजवी हे इस्लाम धर्माचे विरोधक आहेत. त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश महामंत्री जुनेद खान यांनी केली आहे. कुरआन शरीफमधून २६ आयते कमी करण्यासाठी रीजवी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावरून ते इस्लाम धर्मात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप खान यांनी केला आहे. 

रीजवी यांनी सर्वोच्च न्यायालयात ११ मार्चला सदर याचिका दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, कुरआन शरीफमध्ये असलेल्या ‘त्या’ २६ आयतांमुळे धर्माधर्मांत तेढ निर्माण होतो. मुळात हे धादांत खोटे आहे. त्यांनी ही याचिका दाखल केल्यानंतर देशभरातून त्यांचा विरोध सुरू झाला आहे. या विरोधाने आंदोलनाचे स्वरूप घेण्यापूर्वी त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी. यासाठी जुनेद खान यांनी नागपूरचे निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांची यांना निवेदन दिले आहे. 

निवेदनात खान म्हणतात, कुरआनमधील आयते कमी करण्याचा किंवा वाढवण्याचा अधिकार कुणालाही नाही. तशी मागणी करणेही अत्यंत चुकीचे आहे. याचिका दाखल करून अशी विचित्र मागणी केल्यामुळे देशभरातील मुस्लीम बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. देशभरातून त्यांच्या विरोधात रोष व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका रद्द करावी आणि वसीम रिजवीच्या विरोधात भादंविच्या कलम २९५ अन्वये गुन्हा दाखल करावा. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना त्यांच्यासोबत भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश सचिव असलम खान, माजी प्रदेश सचिव अश्फाक शेख व सरफराज लीडर होते. 

इस्लाम धर्माचे सुरुवातीचे तीन खलीफांच्या विरोधात अनेक खोटे व बिनबुडाचे आरोप वसीम यांनी केले आहेत. यामुळे इतर धर्मांमध्येही इस्लामबद्दल चुकीची माहिती गेली. त्यामुळे धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम रिजवी करीत आहेत. युद्ध प्रसंग, आयती व अत्याचाराच्या विरोधात लढण्याची शिकवण देणाऱ्या आयती चुकीच्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न रिजवी यांनी केला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय ही याचिका रद्द करेल, अशी अपेक्षा जुनेद खान यांनी व्यक्त केली. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com