ठरले एकदाचे, शहरात लॉकडाऊन नाही !

लॉकडाऊनमुळे होणारे परिणाम, दुष्परिणाम यावर चर्चा झाली. लॉकडाऊन करायचे झाल्यास कशा प्रकारे करावे, काय सुरू राहील, काय बंद ठेवायचे यावरही चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र, लॉकडाऊनला जवळपास सर्वच अधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला.
nagpur zero mile-corona
nagpur zero mile-corona

नागपूर : नागरिकांनी पुन्हा लॉकडाऊनची धास्ती घेतली होती. महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे लॉकडाऊन करण्याचे संकेत अधूनमधून देत होते. त्यासाठी बैठकांवर बैठका सुरू होत्या. पण लॉकडाऊनला नागरिकांचा विरोधच होता. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाउनवरून उलटसुलट चर्चांना ऊत आला आहे. काही दिवसांपूर्वी शहरात कडक लॉकडाऊन होणार, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, शहरात लॉकडाऊन न करण्याचा निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. 

आता शहरात रोज ३०० च्या वर कोरोनाचे रुग्ण वाढ होत आहेत. काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. परंतु, नंतर रुग्णसंख्या आटोक्यात आली नसल्याचे समोर आले. उलट, नागरिकांची गैरसोय झाली. आयुक्त तुकाराम मुंढे महानगरपालिकेचे आयुक्त बाबत आग्रही होते. मात्र, ग्रामीण भागात लॉकडाऊन करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी आधीच स्पष्ट नकार दिला होता. शहरात लॉकडाऊन करण्यास अनेकांनी विरोध दर्शविला होता. पालकमंत्री नितीन राऊतही कडक लॉकडाउनच्या विरोधात होते. लॉकडाउन स्मार्ट असेल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले होते. 

लॉकडाऊनसंर्दभात निर्णय घेण्यासाठी अधिकाऱ्यांची समिती गठित करण्यात आली. यात विभागीय आयुक्त संजीव कुमार, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलीस अधीक्षक राकेश ओला आदींचा समावेश होता. या अधिकाऱ्यांच्या अनेकदा बैठका झाल्या. त्यात लॉकडाऊनसंदर्भात चर्चा झाली. लॉकडाऊनमुळे होणारे परिणाम, दुष्परिणाम यावर चर्चा झाली. लॉकडाऊन करायचे झाल्यास कशा प्रकारे करावे, काय सुरू राहील, काय बंद ठेवायचे यावरही चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र, लॉकडाऊनला जवळपास सर्वच अधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला. 

लॉकडाऊनबाबत अधिकाऱ्यांच्या अनेक बैठका झाल्या. त्यात सर्व बाजूंवर चर्चा करण्यात आल्यानंतर लॉकडाऊन न करण्याचा निर्णय घेण्यात आला. 
- संजीव कुमार, विभागीय आयुक्त.  (Edited By : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com