भाजपशी जवळीक असलेला ओबीसी नेता राष्ट्रवादीच्या गळाला, भाजपला मोठा धक्का...

डॉ. जीवतोडेंना मोठा राजकीय वारसा आहे. १९६७ मध्ये राजुरा विधानसभा क्षेत्रातून त्यांचे वडील दिवंगत श्रीहरी जीवतोडे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. त्यांचे बंधू दिवंगत संजय जीवतोडे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षाशी जुळले होते.
Ashok Jivtode NCP Entry
Ashok Jivtode NCP Entry

चंद्रपूर :  चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणात आज बुधवारी एक मोठी राजकीय घडामोड झाली. विदर्भाच्या शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे Dr. Ashok Jivtode यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतलाय. Entered in NCP खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला आहे. या सोहळ्याला प्रांताध्यक्ष जयंत पाटील, Jayant Patil उपमुख्यमंत्री अजित पवार, Deputy chief Minister Ajit Pawar खासदार सुप्रिया सुळे, MP Supriya Sule  प्रफुल्ल पटेल Prafull Patel यांची उपस्थिती होती. मुंबईतील यशवंतराव प्रतिष्ठान येथे हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला.

चंद्रपूर आणि विदर्भातील  शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज समजले जाणारे डॉ. जीवतोडे यांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीने भाजपशी जवळीक असलेला एक परिचित मोहरा आपल्यात ओढून घेतल्याचे बोलले जात आहे. विदर्भाच्या विविध जिल्ह्यांत पसरलेल्या शिक्षण संस्था आणि ओबीसी महासंघाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर कामाची छाप असलेले डॉ. जीवतोडे यांच्या रूपाने राष्ट्रवादीला जिल्ह्यात एक दमदार चेहरा मिळाला आहे. डॉ. जीवतोडे मागील ३५  वर्षांपासून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. चांदा शिक्षण मंडळाचे ते सचिव आहे. या संस्थेचे यवतमाळ, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात मोठे शैक्षणिक जाळे आहे. 

डॉ. जीवतोडेंना मोठा राजकीय वारसा आहे. १९६७ मध्ये राजुरा विधानसभा क्षेत्रातून त्यांचे वडील दिवंगत श्रीहरी जीवतोडे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. त्यांचे बंधू दिवंगत संजय जीवतोडे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षाशी जुळले  होते. डॉ. अशोक जीवतोडे यांची भाजपशी जवळीक होती. मात्र त्यांनी भाजपमध्ये कधीच अधिकृत प्रवेश केला नाही. पण लोकसभा निवडणुकीत एका प्रचारसभेत त्यांनी मंचावर उपस्थिती दर्शविली होती. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाने भाजपला मोठा धक्का पोहोचला आहे. यादरम्यान त्यांनी स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीत सुद्धा सक्रिय सहभाग घेतला. त्याचवेळी ओबीसी समाजाच्या जनजागृतीचे काम हाती घेतले. 

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ते राष्ट्रीय समन्वयक आहेत. नागपूर, दिल्ली आणि हैद्राबाद आदी ठिकाणी त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील शिबिरांचे आयोजन केले. ओबीसी मंत्रालयाच्या स्थापनेसाठी नागपूर हिवाळी अधिवेशनात १८ डिसेंबर २०१८ रोजा मोर्चा काढला. त्यात डॉ. जीवतोडे यांनी इतर ओबीसी नेत्यासोबत मोर्चाचे नेतृत्व केले. चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्था फारशा चांगली नाही. डॉ. जीवतोडे यांच्या रूपाने आर्थिक ताकद आणि लोकसंग्रह असलेला नेता मिळाला. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात चांगले दिवस येतील, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com