उपराजधानीत आज कोरोनाबाधित ओलांडणार पाऊण लाखाचा आकडा ?

काल१६५० बाधितांनी कोरोनावर मात केली. यात शहरातील १३२० तर ग्रामीण भागातील ३३० जणांचा समावेश आहे. काल बरे होऊन घरी गेलेल्या नागरिकांसह कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ५८,२६६ पर्यंत पोहोचली. शहरातील ४६ हजार ९७३ जण योग्य आहार, औषधी घेत कोरोनाच्या तावडीतून सुटले. ग्रामीणमधील ११ हजार २९३ जण कोरोनामुक्त झाले.
nagpur zero mile-corona
nagpur zero mile-corona

नागपूर : उपराजधानीत कोरोनाचे भय अद्याप कमी झालेले नाही. पण दररोज बाधीत आढळणाऱ्यांच्या संख्या दीड ते दोन हजारावरून सहाशेच्या खाली आली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून कमी बाधीत आढळत आहे. त्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अडीच पटीने आहे. एकूण बाधितांची संख्या ७४ हजार ८२१ आहे. त्यामुळे आज हा आकडा पाऊण लाखाच्या वर जाण्याची पूर्ण शक्यता आहे. 

दररोज हजार ते दोन हजार बाधितांच्या संख्येने आरोग्य विभाग, मनपाच्या जिवाला घोर लागला होता. परंतु, आता गेल्या चार ते पाच दिवसांत बाधितांचा आलेख सातत्याने खाली घसरत आहे. आज अनेक दिवसांनंतर सहाशेपेक्षा कमी कोरोनाबाधित आढळून आले. बाधितांच्या तुलनेत अडीच पटीने बाधित कोरोनामुक्त झाले. मात्र, रविवारी ४३ जणांचा मृत्यू झाला असून, यात शहरातील २३ जणांचा समावेश असल्याने अजूनही कोरोनाचे संकट कायम आहे. 

गेल्या काही दिवसांत चाचण्यांच्या संख्येत घट झाली. त्याचा परिणाम बाधितांच्या संख्येवर झाला. ४३५५ चाचण्यांचा अहवाल आज रविवारी आला. यातील ५९० जण बाधित आढळून आले. यात शहरातील ३९८ जण तर ग्रामीणमधील १८८ जणांचा समावेश आहे. बाधितांच्या या संख्येसह एकूण बाधितांची संख्या ७४ हजार ८२१ पर्यंत पोहोचली. आज बाधितांची संख्या ७५ हजारांचा आकडा पार करण्याची शक्यता आहे. शहरातील विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या ४३ जणांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे बळींची एकूण संख्या २ हजार ३८३ पर्यंत पोहोचली. दररोज चाळीसवर बाधितांचा मृत्यू होत असल्याने नागरिकांनी सावध होण्याची गरज आहे. 

बाधितांच्या कमी झालेल्या संख्येने बेजबाबदार होण्याऐवजी नागरिकांनी स्वतःच्या फिरण्यावर नियंत्रण आणण्याची गरज व्यक्त केली जात आहे. एकूण बाधितांमध्ये ५९ हजार ५४८ शहरातील असून १४ हजार ८६० ग्रामीण भागातील आहेत. ४१३ जण जिल्ह्‍याबाहेरील आहेत. शहरात आजपर्यंत २ लाख ११० अँटिजेन तर २ लाख ३५ हजार आरटीपीसीआर, अशा एकूण ४ लाख ३५ हजार १४४ चाचण्या करण्यात आल्या. शहरात १० हजार ५४८ तर ग्रामीण भागात ३ हजार ६२४ बाधितांवर उपचार सुरू आहेत. या मोठ्या प्रमाणात घरीच उपचार घेत आहेत. 

५८ हजार २६६ जण कोरोनामुक्त 
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार काल १६५० बाधितांनी कोरोनावर मात केली. यात शहरातील १३२० तर ग्रामीण भागातील ३३० जणांचा समावेश आहे. काल बरे होऊन घरी गेलेल्या नागरिकांसह कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ५८,२६६ पर्यंत पोहोचली. शहरातील ४६ हजार ९७३ जण योग्य आहार, औषधी घेत कोरोनाच्या तावडीतून सुटले. ग्रामीणमधील ११ हजार २९३ जण कोरोनामुक्त झाले.       (Edited By : Atul Mehere) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com