उपराजधानीत लॉकडाऊन शिथील झाल्यापासून झपाट्याने वाढताहेत रुग्ण 

मध्यवर्ती कारागृहातील चार कोरोनाबाधित कैदी मेडिकलमध्ये दाखल आहेत. मात्र काही काळासाठी एक कैदी बेपत्ता झाला होता. बराच वेळ हा कैदी सापडला नाही. अखेर काही तासानंतर या कैद्याचा शोध घेण्यात आला. यामुळे चारही कैद्यांना सुरक्षेच्या कारणावरून मेयो रुग्णालयात रेफर करण्यात आले.
nagpur zero mile-corona
nagpur zero mile-corona

नागपूर : जुलैच्या पहिल्या दिवसापासूनच शहराला कोरोनाच्या विषाणूचा विळखा घट्ट आवळला जात असल्याचे दिसून येत आहे. अवघ्या सहा दिवसांत अडिचशेवर कोरोनाबाधित आढळल्याने उपराजधानीत कोरोनाचा कहर वाढतच आहे. काल आणखी 29 कोरोनाबाधित आढळून आले. त्यात मध्यवर्ती कारागृहीतील 15 जणांचा समावेश असल्यामुळे आकडा अधिकच फुगला. शहरात कोरोनाबाधितांची संख्या अठराशेवर पोचली आहे. डागा रुग्णालयातील एका गर्भवतीलाही कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. 

लॉकडाउनची सक्ती कमी झाली आणि शहरात चौफेर कोरोनाच्या विषाणूचा फैलाव सुरू झाला. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या साखळीत वाढ झालेल्या बाधितांमध्ये कमाल चौक आणि कोराडी रोडवरील प्रत्येकी एका व्यक्तीचा अहवाल खासगी प्रयोगशाळेतून बाधित आला आहे. तर मध्यप्रदेशातील सिवनी, हंसापूरी आणि भांडेवाडी, सूर्यननगर हज हाऊस, तेलंगखेडी, मिनीमातानगर येथील प्रत्येकी एकाला बाधा झाल्याचे आढळले. तर बजेरियातील 2 संशयितांच्या घशातील स्त्राव नमुने बाधित आढळले. रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानालाही बाधा झाल्याचे मेयोतील प्रयोगशाळेतून पुढे आले. बजाजनगर या वस्तीत पहिला कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर खामला या वस्तीची नोंद झाली होती. तेव्हापासून तीन महिन्यांनंतर पुन्हा खामला कोरोनाच्या नकाशावर आले आहे. 

महावितरणचे कर्मचारी बाधित 
आतापर्यंत नाईक तलाव, बांग्ला देश, मोमीनपुरा, सतरंजीपुरा, टिमकी, हंसापुरी, भानखेडा, चंद्रमणीनगर अशा वस्त्यांमधील नागरिक कोरोनाच्या विळख्यात येत होते. मात्र आता कोरोनाने शासकीय कार्यालयात प्रवेश केला. महावितरणच्या 19 कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले. रायपूर येथे आलेल्या चक्रीवादळानंतर येथील विद्युत यंत्रणेतील ब्रेकडाऊन सुधारण्यासाठी महावितरणचे कर्मचारी गेले होते. मात्र येताना त्यांनाही कोरोनाने घेरले. नागपूर जिल्ह्यातील 10 तर वर्धा जिल्ह्यातील 9 जणांना बाधा झाल्याचे पुढे आले. 

एमएलए कोविड सेंटरमध्ये 28 रुग्ण 
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने कोविड सेंटर तयार करण्यावर भर देण्यात आला. लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधित रुग्णांसाठी आमदार निवास विलगीकरण केंद्राला "कोविड सेंटर'मध्ये रूपांतरित करण्यात आले. लक्षणे दिसत नसलेल्या मेयोतील 18 जणांना तर मेडिकलमधील 10 जणांना ठेवण्यात आले आहे. लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधित रुग्णांवर डॉक्‍टरांची नजर असणार आहे. त्यासाठी मेडिकल, मेयोमधील डॉक्‍टरांची सेवा ऑन कॉल मिळेल. 

मेडिकलमधील कैदी बेपत्ता 
मध्यवर्ती कारागृहातील चार कोरोनाबाधित कैदी मेडिकलमध्ये दाखल आहेत. मात्र काही काळासाठी एक कैदी बेपत्ता झाला होता. बराच वेळ हा कैदी सापडला नाही. अखेर काही तासानंतर या कैद्याचा शोध घेण्यात आला. यामुळे चारही कैद्यांना सुरक्षेच्या कारणावरून मेयो रुग्णालयात रेफर करण्यात आले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com