कुख्यात संतोष आंबेकर आणि राजा गौस कोरोनाबाधित, कारागृहातच उपचार सुरू

मध्यवर्ती कारागृहात कोरोनाने शिरकाव केला असून आतापर्यंत 192 कैदी आणि कारागृह कर्मचारी आणि अधिकारी कोरोना बाधित झाले आहेत. यामध्ये नव्याने डॉन संतोष आंबेकर हा कोरोना बाधित झाला. तासाभरात दुसरा गॅंगस्टर राजा गौस याचाही रिपोर्ट पॉझिटीव्ह आला.
Santosh Ambekar-Raja Gous
Santosh Ambekar-Raja Gous

नागपूर : राज्यभर नावाजलेला कुख्यात डॉन संतोष आंबेकर आणि राजा गौस हे दोघे सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहेत. तेथे दोघांनाही कोरोनाची बाधा झाली. कारागृहातीलच रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोघेही कुख्यात कोरोना पॉझीटिव्ह आढळल्यामुळे गुन्हेगारी जगतात विविध चर्चा होत आहेत. 

कारागृहातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुख्यात डॉन संतोष आंबेकरची शहरात एकतर्फी दहशत होती. त्याच्या प्रत्येक पंटरकडे विदेशी पिस्तूल असल्याची माहिती आहे. डॉन आंबेकरने गुजरातच्या दोन व्यापाऱ्यांची पाच कोटींनी फसवणूक केली. तसेच मुंबईच्या व्यापाऱ्याला भूखंड खरेदीत गंडविले होते. तसेच इतवारीतील एका सराफा व्यापाऱ्याचे घर हडपले होते. तसेच एका 17 वर्षाच्या मुलीवर ब्युटीपार्लरमध्ये बलात्कार केला होता तर लकडगंजमधील एका डॉक्‍टर तरूणीवर सलग पाच वर्षे बलात्कार केल्याचा आरोप डॉन आंबेकरवर आहे. या सर्व गुन्ह्यांत गुन्हे शाखेचे डीसीपी गजानन राजमाने यांनी डॉन आंबेकरला अटक केली आहे. सध्या आंबेकर मध्यवर्ती कारागृहात न्यायाधीन कैदी म्हणून दाखल आहे. 

मध्यवर्ती कारागृहात कोरोनाने शिरकाव केला असून आतापर्यंत 192 कैदी आणि कारागृह कर्मचारी आणि अधिकारी कोरोना बाधित झाले आहेत. यामध्ये नव्याने डॉन संतोष आंबेकर हा कोरोना बाधित झाला. तासाभरात दुसरा गॅंगस्टर राजा गौस याचाही रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. कारागृहातील डॉक्‍टर्स कोरोना बाधितांच्या आरोग्याकडे लक्ष ठेवून आहेत. दोन्ही गॅंगस्टर्सला विशेष सेलमध्ये ठेवण्यात आले असून त्यांना बाहेर निघण्यास मनाई करण्यात आली. त्यांना सेलमध्ये विलीगकरणात ठेवण्यात आले आहे. राजा गौस हा 2013 पासून मध्यवर्ती कारागृहात आहे. त्याला उत्तरप्रदेशातील प्रतापगढमधून अटक करण्यात आली होती. त्याने रोशन समरित या युवकाचा खून केला होता तसेच पोलिसांवरही गोळीबार करून पळ काढला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com