मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त करून काही होणार नाही, कॉंग्रेसने पाठिंबा काढावा... - nothing will happen by expressing desire congress should withdraw support | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त करून काही होणार नाही, कॉंग्रेसने पाठिंबा काढावा...

सरकारनामा ब्यरो
सोमवार, 14 जून 2021

नाना पटोले यांनी नुकतेच राज्यात विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल. तसेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनण्यास नाना पटोले यांची तयारी असल्याची महत्त्वाकांक्षा नाना पटोले यांनी स्वतः व्यक्त केली आहे. त्यामुळे काँग्रेसने महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदाचा आग्रह धरला पाहिजे.

मुंबई : महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले State president of congress Mr. Nana Patole यांना काल बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर On tour of Buldana district असताना एका कार्यक्रमात मुख्यमंत्री Chief Minister होण्याची इच्छा बोलून दाखविली. यावर फक्त इच्छा व्यक्त करून चालणार नाही तर काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरावा अन्यथा पाठिंबा काढून घ्यावा, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले Ramdas Athavale यांनी केले आहे. 

आठवले म्हणाले, फक्त इच्छा व्यक्त करून चालणार नाही तर काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरला पाहिजे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे काँग्रेसच्या पाठिंब्यावर तरलेले सरकार आहे. काँग्रेसने पाठिंबा काढला तर महाविकास आघाडी सरकार पडेल. त्यामुळे काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा आग्रह धरला पाहिजे. जर काँग्रेसला मुख्यमंत्री पद दिले जात नसेल, तर काँग्रेसने महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढावा, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना केले आहे.

नाना पटोले यांनी नुकतेच राज्यात विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल. तसेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनण्यास नाना पटोले यांची तयारी असल्याची महत्त्वाकांक्षा नाना पटोले यांनी स्वतः व्यक्त केली आहे. त्यामुळे काँग्रेसने महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदाचा आग्रह धरला पाहिजे आणि मुख्यमंत्रिपद मिळविले पाहिजे. जर मुख्यमंत्री पद देण्यास महाविकास आघाडी सरकार तयार नसेल तर महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काँग्रेस काढला पाहिजे, असे रामदास आठवले यांनी म्हटल्याचे प्रसिद्धिप्रमुख हेमंत रणपिसे यांनी कळविले आहे. 

हेही वाचा : भुजबळांनी आवळल्या हायप्रोफाईल 19 जुगाऱ्यांच्या मुसक्या, अन् पथकाला दिले २५ हजारांचे बक्षीस

नाना प्रत्येक जिल्ह्यात जाऊन स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत. यासाठी हायकमांडही तयार आहेत, असे ते सांगतात. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार होण्याचीही तयारी त्यांनी केली आहे. राज्याच्या राजकारणात वावरताना प्रत्येकालाच मुख्यमंत्री व्हावेसे वाटते. त्यात गैर काहीच नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा बोलून दाखवून नानांनी विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिल्याचे दिसत आहे. यावर शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून काय प्रतिक्रिया येते, याची प्रतीक्षा आहे.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख