नोटा ठरला निर्णायक;  ईश्वरचिठ्ठीने लागला निकाल...

विहिरगावमध्ये निवडणुकीच्या पूर्वी एक सदस्य बिनविरोध निवडून आला आहे. सरपंचपदाचे आरक्षण जाहिर झाल्यानंतर वातावरण एकदा अजून तापणार आहे. पण सध्या मात्र आज मतमोजणी केंद्रावर घडलेल्या या प्रकाराची संपुर्ण तालुक्यात चर्चा सुरू आहे.
Nota
Nota

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. अगदी क्रिकेट मॅचसारखं… कोणाचा गेम होईल, अन् कोण बाजी मारेल, हे शेवटपर्यत सांगता येत नाही. गोंडपिपरी तालुक्यातील विहीरगाव ग्रामपंचायतीमध्ये  आज अशाच एका रंजक निकालाच्या घटनेची अनुभूती आली. दोन महिला उमेदवारांना समान मत मिळाले. अन् एक मत नोटावर गेले. मग काय एका मुलाच्या हाताने ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. 

ईश्‍वरचिठ्ठीच्या माध्यमातून लागलेल्या निकालाची संपूर्ण मतमोजणीच्या वेळी रंजक चर्चा होती. गोंडपिपरी तालुक्यातील विहीरगाव ग्रामपंचायतीमधील वार्ड क्रमांक 3 मधील उमेदवारी अनुसूचित जमाती महिलेकरिता आरक्षित होती. कल्पना मडावी व आशा मडावी या आमनेसामने होत्या. या वार्डाची निवडणूक अतिशय अटीतटीची झाली. पंधरा तारखेला निवडणूक पार पडली. अन् या वार्डात एकूण 117 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आज सकाळी सकाळी मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीत विहीरगावच्या मतमोजणीला सुरुवात झाली. अन कल्पना मडावी अन् आशा मडावी या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 58 मते मिळाली. 

एक मत नोटावर होत. दोघींनाही समान मत मिळाल्याने तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी के.डी. मेश्राम यांनी ईश्‍वरचिठ्ठीने निकाल देण्याचा निर्णय दिला. यावेळी एका बालकाच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. यात आशा मडावी या भाग्यवान ठरल्या. आशा मडावी अशा पद्धतीने निवडून आल्याने त्यांचे भाग्य मोठे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. विहिरगावमध्ये निवडणुकीच्या पूर्वी एक सदस्य बिनविरोध निवडून आला आहे. सरपंचपदाचे आरक्षण जाहिर झाल्यानंतर वातावरण एकदा अजून तापणार आहे. पण सध्या मात्र आज मतमोजणी केंद्रावर घडलेल्या या प्रकाराची संपुर्ण तालुक्यात चर्चा सुरू आहे.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com