महापालिका, झेडपी निवडणूक : ओबीसी उमेदवारांना करावा लागणार दिग्गज दावेदारांचा सामना... - nmc zp elections obc candidates will have to face veteran contenders | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

महापालिका, झेडपी निवडणूक : ओबीसी उमेदवारांना करावा लागणार दिग्गज दावेदारांचा सामना...

राजेश चरपे 
बुधवार, 2 जून 2021

नागपूर महापालिकेत एकूण १५१ नगरसेवक आहेत. त्यांपैकी २७ टक्के जागा ओबीसींसाठी आरक्षित असायच्या. राखीव जागेवरून एकूण ३७ ओबीसी समाजाचे नगरसेवक निवडून आले आहेत. महापालिकेत ओबीसी समाजाचे एकूण ७६ नगरसेवक आहेत.

नागपूर : सहा महिन्यांनंतर नागपूर महानगरपालिकेची निवडणूक आणि जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक Electionओबीसी उमेदवारांना आगामी निवडणुकीत खुल्या प्रवर्गातूनच लढावे लागेल of Nagpur Municipal Corporation and by-election of Zilla Parishad होऊ घातली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे भिजत घोंगडे अद्याप कायम आहे. OBC candidates will have to fight in the open category in the upcoming elections त्यामुळे खुल्या प्रवर्गात ओबीसी उमेदवारांसमोर अनेक दिग्गज उमेदवार आव्हान निर्माण करणार आहेत. 

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण देण्यास नकार दिला आहे. आरक्षण हवे असल्यास कशाच्या आधारावर द्यायचे याचा सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्याकरिता सेवानिवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकाराला आयोग नेमावा लागणार आहे. आयोगाला सर्वेक्षण, सुनावणी, ओबीसी समाजाची लोकसंख्या इत्यादी इत्थंभूत माहिती सादर करावी लागणार आहे. याकरिता किमान वर्षभराचा कालावधी लागू शकतो. सहा महिन्यानंतर नागपूर महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. त्याशिवाय नागपूर जिल्हा परिषदेतील ओबीसींच्या राखीव जागेवर लढलेल्या सदस्य रद्द झालेल्या रिक्त जागांवर पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. 

आगामी निवडणुकीतील राखीव जागेसमोरील ‘नामाप' राखीव हा कॉलमच त्यात असणार नाही. त्यामुळे खुल्या जागेवर लढताना ओबीसी समाजाच्या उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात अनेक दावेदारांशी लढत द्यावी लागणार आहे. त्यामुळे सभागृहातील ओबीसी समाजाची संख्याही घटण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागपूर महापालिकेतून अनेक ओबीसीचे नेत्वृत्व उदयाला आहेत. त्यांपैकी काही विधानसभेत पोहोचले आहेत. आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास ठाकरे, आमदार मोहन मते, आमदार प्रवीण दटके, आमदार परिणय फुके हे राज्याच्या राजकारणात दाखल झाले आहेत. 

हेही वाचा : जी चूक फडणवीस सरकारने केली होती, तीच ठाकरे सरकारने केली...

ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल गुडधे, मनपातील सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, काँग्रेसचे गटनेते तानाजी वनवे, बाल्या बोरकर, दुनेश्वर पेठेही ओबीसी समाजामधूनच आले आहेत. नागपूर महापालिकेत एकूण १५१ नगरसेवक आहेत. त्यांपैकी २७ टक्के जागा ओबीसींसाठी आरक्षित असायच्या. राखीव जागेवरून एकूण ३७ ओबीसी समाजाचे नगरसेवक निवडून आले आहेत. महापालिकेत ओबीसी समाजाचे एकूण ७६ नगरसेवक आहेत. उर्वरित नगरसेवक खुल्या प्रवर्गातून निवडून आले आहेत. जिल्हा परिषदेत ५९ जागा आहेत. तेथेही आता अशीच स्थिती बघावयास मिळणार आहे. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख