वनकरांना उमेदवारी देण्यावरून नितीन राऊत नाराज

मुंबईमध्ये कॉंग्रेस पक्षाच्या झालेल्या बैठकीत डॉ. नितीन राऊत यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे नाराजी बोलून दाखवली. त्यामुळे आता पक्षात नवीन वाद सुरू होतो की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.
Nitin Raut
Nitin Raut

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील कलावंत अनिरुद्ध वनकर यांना कॉंग्रेसतर्फे राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत पक्षावर नाराज आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे डॉ. राऊत यांना नाराजी व्यक्त केली असून पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे. 

वनकर यांना उमेदवारी दिल्यावरून पक्षाच्या बैठकीत वाद झाल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. त्यांना उमेदवारी देताना पक्षात विचारविनिमय झाला नाही. कुणाचेही मत जाणून घेतले गेले नाही, असा आक्षेप डॉ. राऊत यांना घेतला. कारण अनिरुद्ध वनकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून कॉंग्रेस उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढविली होती. काँग्रेसमधील अनुसूचित जमाती वर्गातील नेत्याला विधानपरिषदेवर संधी द्यायला हवी होती, मात्र त्याऐवजी वनकरांना उमेदवारी दिल्याची तक्रार हायकमांडकडे तेव्हा करण्यात आली होती. पण त्याचीही दखल घेण्यात आली नव्हती. तेव्हापासूनच वनकर यांच्या उमेदवारीवरून पक्षात धुसफुस सुरू होती. 

मुंबईमध्ये कॉंग्रेस पक्षाच्या झालेल्या बैठकीत डॉ. नितीन राऊत यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे नाराजी बोलून दाखवली. त्यामुळे आता पक्षात नवीन वाद सुरू होतो की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात लढलेल्या व्यक्तीला राज्यपाल कोट्यातून नियुक्त करावयाच्या पदासाठी उमेदवारी देणे सर्वथा चुकीचे आहे, असा मतप्रवाह तेव्हाच उमटला होता. पण त्यावेळी उघडपणे कुणी नाराजी व्यक्त केली नव्हती. आता ऊर्जामंत्र्यांनी उघड उघड नाराजी व्यक्त केल्याने पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेतात, याकडे पक्षातील मंडळीसह सर्वांचे लक्ष लागले आहे. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com