नितीन गडकरींनी लावला फोन, अन् नागपूरला मिळाले ५ हजार रेमडेसिव्हर… - nitin gadkari dial phone call nagpur gets ten thousand remedisivour | Politics Marathi News - Sarkarnama

नितीन गडकरींनी लावला फोन, अन् नागपूरला मिळाले ५ हजार रेमडेसिव्हर…

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 10 एप्रिल 2021

याशिवाय कोरोनाच्या रुग्णांसाठी त्यांनी यापूर्वीच त्यांच्या कार्यालयामार्फत सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आता स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना या सुविधांचा त्यांनी विस्तार केला आहे. नागपुरात विधानसभा मतदारसंघनिहाय यंत्रणा तयार करण्यात आली आहे.

नागपूर : कोरोनाचा प्रकोप दिवसागणिक वाढत असताना रेमडेसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा सर्वत्र भासतोय. सर्वत्र रेमडेसिव्हरचा काळाबाजार होत असल्याची ओरड होत आहे. तर याचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा आरोप कालच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस यांनी केला होता. आज नितीन गडकरींनी एक फोन लावला आणि आजच ५ हजार रेमडेसवीर इंजेक्शन येणार आहेत. 

रेमडेसिव्हर इंजेक्शनसाठी हाहाकार उडाला असल्याची माहिती नितीन गडकरींना मिळाली. त्यांनी लगेच सन फार्मा कंपनीच्या मालकांना फोन केला आणि त्यांना रेमडेसिव्हरची गरज प्रतिपादित करून त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर नागपुरात आजच ५ हजार इंजेक्शन येणार आहेत आणि येत्या दोन दिवसांत आणखी ५ हजार इंजेक्शन येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. इंजेक्शनवर राज्यभर राजकारण होत असताना गडकरींनी त्या भानगडीत न पडता थेट रेमडेसिव्हरची तुटच भरून काढली. त्यामुळे राजकारणापेक्षा समाजकारणच मोठे, हे त्यांना पुन्हा एकदा आपल्या कृतीतून सिद्ध केले असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. 

याशिवाय कोरोनाच्या रुग्णांसाठी त्यांनी यापूर्वीच त्यांच्या कार्यालयामार्फत सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आता स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना या सुविधांचा त्यांनी विस्तार केला आहे. नागपुरात विधानसभा मतदारसंघनिहाय यंत्रणा तयार करण्यात आली आहे. रुग्णांसाठी बेड्सची उपलब्धता आणि औषधे मिळण्यातील अडचणी सोडवण्यासाठी आणि लोकांना सुलभरीत्या वेगाने मदत मिळण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाइकांनी खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांच्या कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. 

हेही वाचा : कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येचा उदयनराजेंनी अभ्यास करावा : शंभूराज देसाईंच सल्ला

मध्य नागपूर - ०८४५९८९८६५९
दक्षिण नागपूर - ०७६२०८०६३७२
पूर्व नागपूर - ०७६२०५५३८९१
पश्‍चिम नागपूर - ०८४५९६१८८२६
उत्तर नागपूर - ०७६२०९९३२२९
दक्षिण पश्‍चिम - ०७९७२५०७०५२
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख