९ वर्षांच्या चिमुकलीला २०० उठाबश्यांची अमानुष शिक्षा, शिक्षिकेवर गुन्हा दाखल... 

जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी गाथा कपिल मूल चौथ्या वर्गात शिकते. ऑनलाइन वर्गात मुलांना समजत नसल्याने महालगाव येथील शिक्षक, ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीने ठराव घेऊन सात शिक्षक मित्रांची नियुक्ती केली.
Sarkarnama Banner
Sarkarnama Banner

उमरेड (जि. नागपूर) : जिल्हा परिषद शाळेची ९ वर्षांची विद्यार्थिनी शिकवणी वर्गात उशिरा पोहोचली. त्यामुळे संतापलेल्या शिक्षिकेने तिला २०० उठाबश्या गाठण्याची शिक्षा दिली. शिक्षा तर मुलीने भोगली, पण त्यानंतर तिची प्रकृती चांगलीच ढासळली. हा चीड आणणारा प्रकार भिवापूर तालुक्यातील महालगाव येथे घडला. The insident took place at mahalgaon in bhivapur taluka. 

मुलीच्या पालकांनी या प्रकाराची तक्रार पोलिस ठाण्यात केली. पोलिसांनी शिक्षिकेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बरेचदा वर्गात विद्यार्थी ऐकत नाहीत, शिकवण्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे त्यांना शिक्षा केली जाते. पण विद्यार्थ्यांचे वय, शारीरिक स्थिती बघूनही शिक्षा केली पाहिजे. शिक्षा जर जिवावर बेतत असेल, तर तो गुन्हा ठरतो. त्यामुळे आचल कोकाटे या शिक्षिकेच्या या कृत्यामुळे समाजमन संतापले आहे आणि तिलाही कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली जात आहे. 

जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी गाथा कपिल मूल चौथ्या वर्गात शिकते. ऑनलाइन वर्गात मुलांना समजत नसल्याने महालगाव येथील शिक्षक, ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीने ठराव घेऊन सात शिक्षक मित्रांची नियुक्ती केली आणि त्यांना प्रतिशिक्षक दोन हजार रुपये मानधन देण्याचे ठरले. हे शिक्षक आपापल्या घरी वर्ग घ्यायचे. गट शिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्ग चारची जबाबदारी आंचल कोकाटे या शिक्षक मैत्रिणीवर होती. ६ जुलैला गाथा शिकवणी वर्गात उशिरा पोहोचल्याने कोकाटे हिने तिला तब्बल २०० उठाबश्या काढण्याची शिक्षा ठोठावल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

शिक्षेनंतर मुलीची प्रकृती बिघडल्याचे तिचे काका पंकज मूल यांनी सांगितले. पालकाच्या तक्रारीनंतर आचल कोकाटे (वय २१, रा. महालगाव), राजेश चौधरी (वय ४०, रा. नागपूर), पांडुरंग बुचे यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचे बेला येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज वाघोडे यांनी सांगितले. चौकशीअंती दोषींवर कारवाई होईल, अशी माहिती वाघोडे यांनी दिली. याबाबत जिल्हा शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 

विद्यार्थ्यांना अशाप्रकारे शिक्षा देणे अशोभनीय आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून जे दोषी आढळतील त्यांच्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल. 
-भारती पाटील, जिल्हा परिषद शिक्षण सभापती, नागपूर 
 
एवढ्या लहान विद्यार्थिनीला शिक्षा करणे चुकीचे आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी गटशिक्षणाधिकारी करीत आहेत. 
- हिमाणे, खंडविकास अधिकारी, भिवापूर 

ग्रामपंचायत आणि शाळा व्यवस्थापन समितीने ठराव घेऊन शिक्षक मित्र नेमले होते. शिक्षक, मुलीच्या मैत्रिणी आणि विद्यार्थिनीची साक्ष घ्यायची आहे. त्यानंतर अहवाल सादर करू. दोषींवर निश्चितच कारवाई करण्यात येईल. 
- विजय कोकोडे गटशिक्षण अधिकारी भिवापूर
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com