२० मार्चला निवडले जाणार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नवीन सरकार्यवाह - the news leader of rss will be electec on twenty march | Politics Marathi News - Sarkarnama

२० मार्चला निवडले जाणार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नवीन सरकार्यवाह

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 17 मार्च 2021

गेल्या वर्षी प्रतिनिधी सभा बंगळुरूमध्येच आयोजित करण्यात आली होती. पण कोरोनाच्या स्थितीमुळे ती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण यावेळी ही सभा आम्ही बंगळुरूमध्येच घेणार आहोत. संघाच्या नियमित कामकाजावरही कोरोनाच्या स्थितीचा परिणाम झाला. त्यामुळेच महत्वाची असलेली प्रांत प्रचारकांची बैठकही स्थगित करण्यात आली.

नागपूर : १९ आणि २० मार्चला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधींची बैठक बेंगळुरूमधील जनसेवा विद्या केंद्रात होणार आहे. या बैठकीला देशभरातून १५०० सदस्य उपस्थित राहणार आहे. कोरोनाची स्थिती पाहता ४५० सदस्य बेंगळुरू येथे तर १००० सदस्य देशातील ४४ वेगवेगळ्या ठिकाणांहून ऑनलाइन उपस्थित राहणार आहेत. २० मार्चला दुसऱ्या सत्रात संघाच्या सरकार्यवाह यांच्या निवडीची प्रक्रिया होणार असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरुण कुमार यांनी सांगितले. 

अरुण कुमार म्हणाले, १९ मार्चला सकाळी बैठक सुरू होईल. पहिले सत्र सकाळी ८.३० वाजता होईल. त्यानंतर ९ वाजता पत्रकार परिषद होणार आहे. सह सरकार्यवाह डा. मनमोहन वैद्य पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार आहेत. ते प्रस्तावांसंदर्भात माहिती देतील. दर तीन वर्षांनंतर सहकार्यवाह निवड होत असते. सामाजिक आणि धार्मिक संघटनांना सोबत घेऊन समाजव्यापी, राष्ट्रव्यापी शक्ती उभारणे हे संघाचे उद्दिष्ट आहे. गेल्या वर्षभरात कोरोनाच्या उद्रेकामुळे संघाचे कामकाज कमी प्रमाणात झाले असले तरी स्वयंसेवक आणि कार्यकर्ते समाजातील लोकांच्या सतत संपर्कात होते. 

कोरोनाच्या काळातही धार्मिक आणि सामाजिक कार्य करणारे लोक आमच्या संपर्कात आले, आमच्यासोबत जुळले. त्यामुळे आम्हाला अनेक नवीन ठिकाणांवर पोहोचणे शक्य झाले. असे कार्य करणाऱ्यांना सोबत घेऊन समाजात जनजागृती करण्यासाठी काय नवीन करता येईल, या विषयावर बैठकीत चर्चा होणार आहे. दर तीन वर्षांनी केलेल्या कामांचे समीक्षण केले जाते. त्यामुळे सामाजिक परिवर्तनाच्या कामांत आजवर किती काम झाले आणि पुढील तीन वर्षांत कोणत्या योजना राबवायच्या यावरसुद्धा या बैठकीत कार्याची दिशा ठरवण्यात येणार आहे. यासाठी ६० हजार मंडळ तयार करण्यात आले आहेत. यामध्ये जवळपास ६५ हजार ठिकाणांवर संघाचे कार्यकर्ते आहेत. पण आता या ठिकाणांवरील सर्व परिवारांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे अरुण कुमार म्हणाले. 

गेल्या वर्षी प्रतिनिधी सभा बंगळुरूमध्येच आयोजित करण्यात आली होती. पण कोरोनाच्या स्थितीमुळे ती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण यावेळी ही सभा आम्ही बंगळुरूमध्येच घेणार आहोत. संघाच्या नियमित कामकाजावरही कोरोनाच्या स्थितीचा परिणाम झाला. त्यामुळेच महत्वाची असलेली प्रांत प्रचारकांची बैठकही स्थगित करण्यात आली असल्याचे अरुण कुमार यांनी सांगितले. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख