मेयोतून पाठवण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये आढळला नवीन स्ट्रेन... - new strain found in samples sent from meyo hospital | Politics Marathi News - Sarkarnama

मेयोतून पाठवण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये आढळला नवीन स्ट्रेन...

केवल जीवनतारे
गुरुवार, 1 एप्रिल 2021

नागपुरातील मेयो रुग्णालयातून दिल्ली येथे पाठवण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये नवीन स्ट्रेन आढळून आल्याची माहिती पुढे आली आहे. मागील दोन महिने नवीन स्ट्रेन आढळून आलेल्या शहरांची नावे गुपित ठेवण्यात आली होती. यामुळे यातील गूढ वाढले होते. राज्यभरातून सुमारे १५ ते २० टक्के नमुन्यांमध्ये हे नवीन म्युटेशन आढळून येत असल्याचे उघड झाले. 

नागपूर : नागपुरात दररोज तीन हजारांच्या वर कोरोनाचे नवीन रुग्ण आढळत आहेत, तर ५०च्या वर मृत्यू दररोज नोंदविले जात आहेत. येथील मेडिकल आणि मेयो रुग्णालयातून नमने दिल्ली आणि पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. मेयो रुग्णालयातून पाठवण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये नवीन स्ट्रेन आढळून आल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळेच कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत चालले आहेत. 

नागपुरातील मेयो आणि मेडिकलमधून सुमारे शंभरावर नवीन स्ट्रेनचे नमुने डिसेंबर २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत तपासणीसाठी दिल्ली तसेच पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. २४ मार्च २०२१ रोजी महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे नवे दोन स्ट्रेन आढळून आल्याचे जाहीर केले, मात्र शहराची नावे गुपित ठेवण्यात आली होती. मेयो रुग्णालयातून पाठवण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये नवीन स्ट्रेन आढळून आल्याची माहिती पुढे आली आहे. नवीन स्ट्रेन असल्यानेच कोरोना संसर्ग अधिक गतीने वाढला असून नवीन स्ट्रेनने आता चिंता वाढवली आहे. 

नागपुरातील मेयो रुग्णालयातून दिल्ली येथे पाठवण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये नवीन स्ट्रेन आढळून आल्याची माहिती पुढे आली आहे. मागील दोन महिने नवीन स्ट्रेन आढळून आलेल्या शहरांची नावे गुपित ठेवण्यात आली होती. यामुळे यातील गूढ वाढले होते. राज्यभरातून सुमारे १५ ते २० टक्के नमुन्यांमध्ये हे नवीन म्युटेशन आढळून येत असल्याचे उघड झाल्यानंतर मात्र संशयाची सुई नागपूरच्या दिशेनेच होती. नागपुरातील मेयो रुग्णालयातून पाठवण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये हे स्ट्रेन आढळून आले आहेत. 

महापौरांचा समाजमाध्यमावर व्हिडिओ 
प्रचंड वेगाने वाढणारा कोविडचा उद्रेक लक्षात घेता कोरोनाचे स्वरूप बदलल्याचे बोलल्या जात आहे. नुकतेच महापौरांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ बनवून हे स्पष्ट केले आहे की, हे कोरोनाचे नवे स्वरूप आहे. आम्हाला अधिक सावधगिरी बाळगावी लागणार आहे. मेडिकल, मेयोतील वैद्यकीय तज्ज्ञांशी संवाद साधला असता, या विषाणूचे ‘म्यूटेशन’ (स्वरूप बदल) होत आहे. यामुळे याचा पॉझिटिव्हीटी दर अधिक आहे. काही नमुन्यांच्या तपासणीतून हे स्पष्ट झाले असून, नागपुरात म्यूटंट व्हायरस आहे. 

हेही वाचा : बेड नसल्याने कोरोनाबाधित रूग्ण पोहोचले थेट महापालिकेत! 

-राज्यात आढळलेल्या कोरोना स्ट्रेन E484Q आणि L448Q 
-कोविडवर निरंतर संशोधन करणाऱ्या तज्ज्ञांनी नाव न सांगण्याच्या अटीवर कोरोनाचे म्युटेशन झाल्याचे मान्य केले आहे 
-नवीन स्ट्रेन विषाणू इतर विषाणूंसारखा आहे 
-प्रत्येक विषाणूत कालांतराने "म्युटेशन’ होते 
-इन्फ्लूएन्झामध्येही तो आढळून आला आहे
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख