तुकाराम मुंढेंवर टिका केल्याने आमदार कृष्णा खोपडेंना नेटकऱ्यांनी धुतले 

काल झालेल्या स्मार्ट सिटीच्या बैठकीचे निमंत्रण आमदार खोपडेंना देण्यात आले नव्हते. त्यामुळे ते मुंढेंवर तसेही चिडून असल्याचेही सांगण्यात येते.त्यांनी अध्यक्ष प्रवीण परदेशींना याबाबत पत्रही पाठविले होते.
Krishna Khopde-Tukaram Mundhe
Krishna Khopde-Tukaram Mundhe

नागपूर : नागपुरच्या पोलीस आयुक्तांनी महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढेंना अटक करावी, असे विधान भारतीय जनता पक्षाचे आमदार कृष्णा खोपडे यांनी काल केले होते. त्यावरुन मुंढेंच्या समर्थकांनी सोशल मिडीयावर आमदार खोपडेंना धू-धू धुतले. काहींनी तर शिवराळ भाषेचा देखील वापर केला. विशेष म्हणजे या विषयात एकही कमेंट आमदार खोपडेंच्या बाजुने नव्हती. 

नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सीईओपदावरुन येथे गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी भाजप आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या चांगलाच वाद सुरू आहे. काल अध्यक्ष प्रवीण परदेशी यांनी तुकाराम मुंढे स्मार्ट सिटीचे सीईओ नव्हतेच, असे म्हणत या वादावर पडडा पाडला. आयुक्तांनी सीईओपद बेकायदेशीररित्या बळकावले होते. त्याविरोधात महापौर संदीप जोशी यांनी सदर पोलीस ठाण्यात आयुक्तांविरोधात तक्रारही दाखल केली आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी आता तुकाराम मुंढेंना अटक करावी, अशी मागणी आमदार खोपडे यांनी केली. त्यावरुन नेटकऱ्यांनी आमदार खोपडेंचा चांगलाच समाचार घेतला. 

नेटकरी मुंढेंच्या समर्थनार्थ म्हणाले की, दम लागतो मुंढे साहेबांना अटक करायला, भ्रष्टाचाऱ्यांचा कर्दनकाळ आहेत मुंढे, मुंढेंना हात लावाल तर जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, जनतेच्या मनावर राज्य करणारे अधिकारी आहेत मुंढे, मुंढे साहेबांसारखे देशात फक्त 100 अधिकारी पाहीजेत, महाराष्ट्र सरकारने मुंढे साहेबांना कायदेशीर आधार द्यावा, हिंमत असेल तर ट्राय करुन बघा, मुंढे साहेबांना हात लागला तर महाराष्ट्रात तांडव होईल, या आणि अशा शेकडो कमेंट आयुक्तांच्या समर्थनार्थ केल्या आहेत. यावरुन तुकाराम मुंढेंचे समर्थक राज्यभरात किती आहेत, याची कल्पना यावी. याशिवाय नागपुरातही मुंढेंच्या समर्थनार्थ काही लोकांना रस्त्यावर येण्याची तयारी चालवली आहे. यापुढे मुंढेच्या विरोधात बोलणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांनी तोंड सांभाळूनच बोलावे, असाही नेटकऱ्यांचा सूर निघाला. 

काल झालेल्या स्मार्ट सिटीच्या बैठकीचे निमंत्रण आमदार खोपडेंना देण्यात आले नव्हते. त्यामुळे ते मुंढेंवर तसेही चिडून असल्याचेही सांगण्यात येते. त्यांनी अध्यक्ष प्रवीण परदेशींना याबाबत पत्रही पाठविले होते. बैठकीत प्रत्येक गोष्ट आयुक्त मुंढेंच्या विरोधात गेली आणि यापुढे ते सीईओ नसतील, तर फक्त समन्वयकाची भूमिका बजावतील, असा निर्णय झाला. त्यामुळे आमदार खोपडेंनी उपरोक्त मागणी केली. पण या मागणीचे पडसाद असेही उमटतील, असे कदाचित त्यांनाही वाटले नसावे. महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि आमदार खोपडे आयुक्त मुंढेंच्या बाबतीत काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com