मुख्यमंत्र्यांनी किंवा मी कुणाचीही माफी मागण्याची गरज नाही : अनिल देशमुख

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना विनंती केली की, या कोरोनाच्या काळात तुम्ही सर्व पक्षाच्या लोकांना एकत्र बोलवा. तुमच्या पक्षाच्या महाराष्ट्रातील मंडळींनाही समज द्या. अशा परिस्थितीत सर्व पक्षांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे, हे त्यांना समजावून सांगा.
Anil Deshmukh
Anil Deshmukh

नागपूर :  विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांत तथ्य नाही. अर्णव गोस्वामी प्रकरणात आमची चौकशी सुरू आहे आणि रीतसर न्यायालयाची परवानगी घेऊन चौकशी केली जात आहे. जो कुणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल. लवकरच या प्रकरणाची चार्जशीट दाखल करणार आहोत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी किंवा मी कुणाचीही माफी मागण्याची आवश्‍यकता नाही, असे गृहमंत्री अनिल देशमुख आज म्हणाले. 

श्री देशमुख म्हणाले, चौकशीच्या बाबतीत कुठलीही आडकाठी नाही. अर्णव गोस्वामी यांनी अन्वय नाईक यांचे ८० लाख रुपये दिले नाही. त्यामुळे नाईक यांनी आत्महत्या केली. मागच्या सरकारने चुकीच्या पद्धतीने हे प्रकरण दाबले होते. या प्रकरणाची फाईल आम्ही ओपन केली आहे आणि चौकशी सुरू आहे. कंगणा राणावतच्या बाबतीत राज्य सरकारचा काही संबंध नाही. कारण त्यांच्या घराचे अतिक्रमण पाडण्याची कारवाई बीएमसीनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला जी मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांना राज्याचा प्रमुख म्हणून आपली भूमिका मांडली आहे. विरोधी पक्षाने विरोधकांची भूमिका योग्य पद्धतीने वठवणे अपेक्षित आहे, पण सरकारवर टिका करण्यातच ते आपला सर्व वेळ आणि शक्ती खर्ची घालत आहेत. 

कोरोनाचा लढा राज्य शासन योग्य पद्धतीने लढत आहे. परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. यामध्ये सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, आरोग्यमंत्री होते. यावेळी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना विनंती केली की, या कोरोनाच्या काळात तुम्ही सर्व पक्षाच्या लोकांना एकत्र बोलवा. तुमच्या पक्षाच्या महाराष्ट्रातील मंडळींनाही समज द्या. अशा परिस्थितीत सर्व पक्षांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे, हे त्यांना समजावून सांगा. कोरोनाच्या लढ्यात सरकार चांगले काम करीत असताना विरोधी पक्ष केवळ चुका काढण्याचे काम करत आहे. या स्थितीत विरोधी पक्षाने सरकारच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची गरज असल्याचे श्री देशमुख म्हणाले. 
(Edited By : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com