राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी दिला काॅंग्रेसला इशारा, म्हणाले स्वतंत्र लढू ! - the ncp city head warned the congress to fight for independence | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी दिला काॅंग्रेसला इशारा, म्हणाले स्वतंत्र लढू !

राजेश चरपे
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

आमचा एकच नगरसेवक आहे. मात्र काँग्रेसच्या तुलनेत आमच्या वाट्याला निम्म्यासुद्धा जागा नव्हत्या. शंभर जागा लढवून काँग्रेसचे फक्त १८ नगरसेवक निवडून आले आहेत. याकडेही अहीरकर यांनी लक्ष वेधले.

नागपूर : महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला गृहित धरून दाहा-बारा जागा दिल्या जात असतील तर ते आता खपवून घेतले जाणार नाही, आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढण्यास तयार आहोत, असा इशारा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिल अहीरकर यांनी दिला.

राष्ट्रवादी आता राज्यात काँग्रेसपेक्षा मोठा पक्ष झाला आहे. आमच्या आमदारांची आणि मंत्र्यांची संख्याही जास्त आहे. शहरात आमची काहीच ताकद नाही, असे वारंवार दर्शवून यापूर्वी काँग्रेसने नेहमची आम्हाला दुय्यम स्थान दिले. विधानसभेत एकही उमेदवार दिला नाही. महापालिकेच्या निवडणुकीत शेवटपर्यंत ताटकळत ठेऊन जेथे आमच्या उमेदवाराचा फारसा जोर नाही अशा जागा सोडल्या जातात.

आमचा एकच नगरसेवक आहे. मात्र काँग्रेसच्या तुलनेत आमच्या वाट्याला निम्म्यासुद्धा जागा नव्हत्या. शंभर जागा लढवून काँग्रेसचे फक्त १८ नगरसेवक निवडून आले आहेत. याकडेही अहीरकर यांनी लक्ष वेधले. आज कोव्हीड इस्पितळासंर्भात निवेदन दिल्यानंतर अहीरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महापालिकेत भाजपला पराभूत करायचे असेल तर दोन्ही काँग्रेस एकत्रित येणे गरजेचे आहे. मात्र राष्ट्रवादीला दुय्यम समजून जागा वाटप केल्यास आम्ही ते सहन करणार नाही, असेही यावेळी अहीरकर यांनी सांगितले.      

(Edited By : Atul Mehere) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख