नाना पटोले म्हणाले, आता अनिल देशमुखांनी संत्री वाटावी ! 

प्रत्येक मुलगी शिकली पाहीजे, याकडे सोनुबाबांचाकटाक्ष असायचा. सर्व विद्यार्थिनी माझ्या मुली आहेत आणि त्या शिकल्याच पाहीजे, असे ते नेहमी म्हणत. खऱ्या अर्थाने त्यांनी "लेक शिकवा' कार्य आयुष्यभर केले. परीसरातल्या हजारो नव्हे, तर लाखो मुलींचे ते पिता होते.
Nana Patole-1-Anil Deshmukh - Sunil Shinde
Nana Patole-1-Anil Deshmukh - Sunil Shinde

नागपूर : सोनुबाबा नावाने प्रसिद्ध असलेले काटोल विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुनील शिंदे स्वतः हाडाचे शेतकरी होते. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांनी आपला आमदारकीचा कार्यकाळ आणि संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. येथील हिवाळी अधिवेशनात ते सर्व मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांना संत्री देऊन शेतकऱ्यांच्या समस्यांची जाणीव करुन देत होते. त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरुन निघणे शक्‍य नाही. पण या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोनुबाबांनी घेतलेला वसा पुढे चालवावा आणि दर अधिवेशनात त्यांच्याप्रमाणेच संत्री वाटून, शेतकऱ्यांचे प्रश्‍न उचलून धरावे. हीच सोनुबाबांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले. 

सुनील शिंदे यांचे काल सकाळी निधन झाले. त्यांच्यावर आज दुपारी त्यांचे मुळ गाव सावरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शोकसभेच्या अध्यक्षस्थानी नाना पटोले होते. गृहमंत्री अनिल देशमुख, माजी आमदार प्रकाश गजभिये आणि भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांच्यासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील लोक उपस्थित होते. त्यांचा मोठा मुलगा अविनाश यांनी अग्नी दिला, तर इतर विधी सतीष आणि संदेश या मुलांनी पार पाडले. कोरोनाच्या या परिस्थितही 300 ते 400 लोक अंत्यसंस्काराला आले होते. पण पूर्ण वेळ सोशल डिस्टंसिंगचे पालन केले गेले. सर्वजण मास्क घालून आले होते आणि ठिकठिकाणी सॅनिटायजरची व्यवस्था होती. 


पटोले म्हणाले, स्वतः शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी त्यांना माहीती होत्या. त्या सोडविण्याचा सोनुबाबांनी सातत्याने प्रयत्न केला. त्यांच्याच प्रयत्नांमुळे येथे संत्र्यावर प्रक्रिया करणारा उद्योग सुरू झाला होता. शेतमालाला भाव मिळावा, यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली, मोर्चे काढले. संत्रा उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी व्रत सुरू केले होते. याचाच एक भाग म्हणून दर हिवाळी अधिवेशनात ते संत्री वाटून शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांना वाटा फोडत होते. गृहमंत्री अनिल देशमुख यांच विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे सोनुबाबांनी घेतलेले व्रत आता त्यांनी पुढे सुरु ठेवावे. अधिवेशनात संत्री वाटून, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळवून देऊन सोनुबाबांचे कार्य जिवंत ठेवावे. 

गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, आम्ही लाडाने त्यांना सोनुबाबा म्हणायचो. शिक्षण क्षेत्रात त्यांनी केले कार्य भरीव आहे. त्यांचे प्रयत्न आणि पुढाकारामुळे परीसरातील मुली शिकू शकल्या. खऱ्या अर्थाने त्यांनी शैक्षणिक क्रांती केली. त्यांनी शिकण्यासाठी फक्त सुविधाच तेवढ्या उपलब्ध करुन दिल्या असे नाही, तर प्रत्येक मुलगी शिकली पाहीजे, याकडे त्यांचा कटाक्ष असायचा. सर्व विद्यार्थिनी माझ्या मुली आहेत आणि त्या शिकल्याच पाहीजे, असे ते नेहमी म्हणत. खऱ्या अर्थाने त्यांनी "लेक शिकवा' कार्य आयुष्यभर केले. परीसरातल्या हजारो नव्हे, तर लाखो मुलींचे ते पिता होते. 

माजी आमदार प्रकाश गजभिये म्हणाले, सोनुबाबांच्या छत्रछायेत आम्ही वाढलो. समाजकारण, राजकारण शिकलो. त्यांच्या नेतृत्वात आंदोलने केली, मोर्चे काढले. त्यांच्या मार्गदर्शनातच खऱ्या अर्थाने आम्ही घडलो. कामाचा उत्साह दांडगा होता. त्यांच्या अखेरच्या काळापर्यंत ते ऍक्‍टीव होते. अगदी आदल्या दिवशीसुद्धा ते शेतात जाऊन आले, लोकांना भेटले होते. एक पितृतुल्य नेता आम्ही गमावला आहे. भारताय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने माजी आमदार सुनील शिंदेंना श्रद्धांजली अर्पण केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com